शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

डिझेल दर घटूनही एसटी प्रवाशांना ‘बुरे दिन’

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

महामंडळ शांत : इंधन दर सहा रुपयांनी कमी होऊनही तिकिटाचे दर जुनेच, स्वस्ताईची प्रतीक्षा

नरेंद्र रानडे -सांगलीमागील महिन्यात दोन वेळा डिझेलचे दर घटल्याने वाहनधारकांत ‘अच्छे दिन’ आल्याचा आनंद असला तरीही, ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या एसटीचे प्रवासी मात्र ‘बुरे दिन’ आल्याचाच अनुभव घेत आहेत. डिझेलचे दर सुमारे सहा रुपयांनी उतरूनही एसटीने अद्याप तिकीट दरात कपात केली नसल्याने प्रवाशांत नाराजी आहे. तिकीट दर कमी करण्याच्या निर्णयाबाबत स्थानिक एसटी अधिकाऱ्यांनी एसटी महामंडळ आणि शासनाकडे बोट दाखवले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने ऐन दिवाळीत अवघ्या बारा दिवसांच्या अंतराने दोन वेळा डिझेलचे दर घटले होते. १९ आॅक्टोबर रोजी ३ रुपये ७२ पैसे आणि ३१ आॅक्टोबर रोजी २ रुपये ५० पैशांनी डिझेल स्वस्त झाले होते. मागील आर्थिक वर्षात एसटीने सरासरी १२ टक्के दरवाढ करुन प्रवाशांचे कंबरडे मोडले होते. एरवी डिझेलचे दर केवळ पन्नास पैसे अथवा एक रुपयाने जरी वाढले तरी, एसटी तातडीने तिकीट दरात वाढ करते. मात्र यंदा डिझेलचे दर घटले आहेत तरी, तिकीट दर कमी करण्याची तत्परता एसटीने दाखविलेली नाही. एसटी महामंडळ तोट्यातच आहे. बहुधा हा तोटा कमी करण्यासाठीच तिकीट दर कमी करण्यास महामंडळ टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जात आहे. दर कपातीचा लाभ मिळालाच नाही...आतापर्यंत डिझेलच्या दराचा निर्देशांक वर-खाली होत राहिला तरीही, एकदा केलेली दरवाढ एसटीने कधीच मागे घेतलेली नाही. आतापर्यंत अमेरिकेकडून, अरब देशातून कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत होती. परंतु मागील महिन्यात अमेरिकेने कच्च्या तेलाची खरेदी कमी केली आहे. साहजिकच कच्च्या तेलाचा साठा शिल्लक राहिल्याने दरामध्ये घसरण झाली आहे. वाढत्या महागाईच्या काळात डिझेलची दरवाढ न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सामान्य जनता अद्यापही बऱ्याच ठिकाणी एसटीवरच अवलंबून आहे. त्यांना तिकीट दर कपातीचा लाभ मात्र घेता आलेला नाही. नव्या सरकारने तातडीने पावले उचलून एसटीचे वाढलेले तिकीट, दर डिझेलचे दर उतरल्यास ‘कमी’ करता येऊ शकतात हे दाखवून द्यावे, अशीच प्रवाशांची अपेक्षा आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत कपात झाल्याने डिझेलच्या दरात घसरण झालेली आहे. सध्या भारत ७० टक्के क्रुड तेल हे अरब देशातून आयात करतो. बाजारपेठेतील दोलायमान परिस्थितीनुसार दरामध्येदेखील बदल होऊ शकतो.- अनिल लोकरे, सांगली जिल्हा पेट्रोल डीलर्स असो.असे असते गणित एसटी भाडेवाढीचेएसटी ज्यावेळी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेते, ती प्रति सहा किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी असते. सध्या पहिल्या टप्प्यास साध्या एसटीचे भाडे रुपये ६.३० पैसे, तर निमआराम गाडीस रुपये ८.६० पैसे आहे. डिझेलचे दर तात्पुरते जरी घटले असले तरी, ते तसेच टिकतील याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. दरवाढीच्या निर्देशांकाप्रमाणे एसटीची दरवाढ होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. शासनाच्या परवानगीशिवाय एसटी महामंडळाला दर वाढविण्याचे अथवा कमी करण्याचे अधिकार नाहीत.- बिराज साळुंखे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, सांगली .डिझेलचे दर घटले तरीही स्थानिक एसटी प्रशासन तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. राज्य शासनाच्या हातातच दर कमी करण्याचे अधिकार आहेत. या धोरणात्मक बाबी आहेत. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.- पी. व्ही. पाऊसकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सांगली. एसटी महामंडळाने महागाईच्या काळात प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे आहे. दर वाढवताना मात्र तातडीने निर्णय घेतले जातात; मग डिझेलचे दर कमी झाल्यावर तिकीट दर कमी होणे अपेक्षित आहे.- गजानन राजमाने, प्रवासी, देशिंग. (ता. कवठेमहांकाळ) दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने सामान्यांना जगणे अवघड झाले आहे. खेडोपाडी जाण्यासाठी सामान्य नागरिक एसटीवरच अवलंबून असतो. मात्र डिझेल दर कमी झाल्यावरदेखील अद्याप एसटीच्या तिकीट दरात घट का झालेली नाही?- संजय दळवी, प्रवासी, व्यंकोचीवाडी (ता. मिरज).डिझेलचे दर घटले तरीही स्थानिक एसटी प्रशासन तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. राज्य शासनाच्या हातातच दर कमी करण्याचे अधिकार आहेत. या धोरणात्मक बाबी आहेत. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.- पी. व्ही. पाऊसकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सांगली.