शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘बिरोबाच्या नावानं चांगभलंऽऽ, काशिलिंगाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात आरेवाडीत साडेतीन लाखावर भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 18:09 IST

ढोल-कैताळाच्या गजरात, सनईच्या निनादात भंडारा उधळीत ‘बिरोबाच्या नावानं चांगभलंऽऽ, काशिलिंगाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाची यात्रा साडेतीन लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात

ढालगाव : ढोल-कैताळाच्या गजरात, सनईच्या निनादात भंडारा उधळीत ‘बिरोबाच्या नावानं चांगभलंऽऽ, काशिलिंगाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाची यात्रा साडेतीन लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात  पार पडली.

महाराष्ट, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या आरेवाडी येथील बिरोबा देवाची यात्रा तीन दिवसांपासून सुरू होती. शुक्रवारी बिरोबा देवाच्या भक्ताला म्हणजेच सूर्याबाला खारा नैवेद्य दाखविण्यात आला. दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिर परिसर फुलून गेला होता. दुपारनंतर खाºया नैवेद्यासाठी बनामध्ये मोठी गर्दी झाली होती. नैवेद्य दाखवून यात्रेची सांगता झाली.

यावर्षी यात्रा समिती व देवस्थान ट्रस्टने आरेवाडी तलावातून व नागज बंधाºयातून टेंभू योजनेचे पाणी शुद्ध करून मुबलक प्रमाणात दिले. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला. महांकाली साखर कारखान्याचे व काही भाविकांचेही टॅँकर पाणी पुरवठ्याचे काम करीत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी बंदोबस्त ठेवला होता. मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागजला मिरज-पंढरपूर राष्टय महामार्गावर सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सव्वाशे पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त असला तरीही यात्रेत शिस्तीची कमतरता जाणवत होती.ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा वैद्यकीय अधिकाºयांसह         पस्तीस जणांचा ताफा पाणी निर्जंतुकीकरणासह रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी सज्ज होता. यात्रेत सव्वातीनशे रुग्णांनी याचा लाभ घेतला. मुंबईच्या काही खासगी डॉक्टरांच्या पथकानेही मोफत वैद्यकीय सेवा दिली. वीज वितरण कंपनीकडून सलग तीन दिवस अखंडित वीजपुरवठा करण्याचे काम सहायक अभियंता व्ही. व्ही. वायफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर ताण पडला नाही. सांगली विभागामार्फत ५२ बसेस सोडण्यात आल्याचे सहायक वाहतूक अधीक्षक बालाजी गायकवाड यांनी सांगितले. मात्र प्रतिवर्षाप्रमाणे  यावर्षी एसटीची तात्पुरती निवारा शेड नव्हती. त्यामुळे गायकवाड स्वत: एसटीसेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना आवाहन करीत होते. मात्र दरवर्षीप्रमाणे मिनी बस नसल्याने खासगी वाहतूकदारांंनीच भाविकांची ने-आण केली.जीर्णोद्धार समितीचे कार्याध्यक्ष जयसिंग शेंडगे वगळता राजकीय नेत्यांनी यात्रेकडे पूर्ण पाठ फिरविली. श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोळेकर, उपाध्यक्ष बिरू कोळेकर, सचिव जगन्नाथ कोळेकर, खजिनदार दाजी कोळेकर, विश्वस्त सचिन कोळेकर, आबा कोळेकर, औदुंबर कोळेकर, दत्तू कोळेकर, धोंडीराम कोळेकर, संतोष कोळेकर, नामदेव कोळेकर, पोलीसपाटील रामचंद्र पाटील यांच्यासह पुजारी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांनी यात्रेसाठी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Sangliसांगली