ओळ : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी त्यांचा सत्कार केला.
मिरज : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जनसुराज्य युवा संघाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सत्कार केला.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक परिषदेशी संलग्न रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी समाजसेवक व संस्था चालविणाऱ्या संस्था, संघटनांची क्षमता वाढविणे व प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने १९८२ पासून कार्यरत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने दक्षिण आशिया व दक्षिण पूर्व आशियात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेस विशेष सल्लागार दर्जा दिला आहे.