शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

शेतीमालास दर मिळाल्याशिवाय विकास अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:48 IST

कडेपूर : आज सर्वजण शेतीमालास योग्य भाव द्यावा अशी मागणी करत आहेत. शेती उत्पादनाचे भाव ठरलेले आहेत. मात्र शेतकºयाकडे जेंव्हा माल असतो, तेव्हा सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले असतात, हा अनुभव आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आमदार ...

कडेपूर : आज सर्वजण शेतीमालास योग्य भाव द्यावा अशी मागणी करत आहेत. शेती उत्पादनाचे भाव ठरलेले आहेत. मात्र शेतकºयाकडे जेंव्हा माल असतो, तेव्हा सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले असतात, हा अनुभव आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आमदार गणपतराव देशमुख यांनी केले.हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे पनवेलचे माजी आमदार विवेक पाटील यांना क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार मोहनराव कदम, आमदार बाळासाहेब पाटील, वैभव नायकवडी, क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील प्रमुख उपस्थित होते.यावेळी गणपतराव देशमुख म्हणाले, भगवानराव पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, दलितांसाठी जगले. शेतकरी व कामगारांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, यासाठी नवा विचार देण्याचे काम केले. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही.आ. मोहनराव कदम म्हणाले, भगवानराव पाटील यांचे कार्य मोठे होते. त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढीस होण्यासाठी त्यांचा पुतळा आणि स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. सत्कारमूर्ती माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, या पुरस्कारामुळे माझ्या भावी जीवनासाठी आदर्शवादी जीवन जगण्यास स्फूर्ती मिळेल. विरोधात राहूनही लोकांची कामे चांगल्या पध्दतीने करू शकतो, हे मी दाखवून दिले आहे. जशी स्वातंत्र्यपूर्व काळात परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आज देशात सुरू आहे. या व्यवस्थेविरूध्द लढण्यासाठी तरूण पिढीने संघर्ष करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.आमदार बाळासाहेब पाटील, वैभव नायकवडी, जयराम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी मानपत्र वाचन केले. विद्यार्थी किमया पाटील आणि उत्कर्ष पाटील यांनी गीत सादर केले.कार्यक्रमास अंधकवी चंद्रकांत देशमुखे, संपतराव पवार, खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव साळुंखे, शेकापचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, आनंदराव पाटील, आत्माराम मोरे, भीमराव मोरे, इंद्रजित पाटील, सदानंद माळी, रघुराज मेटकरी, दमयंती पाटील उपस्थित होते. अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत केले. सागर पाटील यांनी आभार मानले.