शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोठडीतून दरोडेखोरांचे पलायन

By admin | Updated: June 2, 2015 00:36 IST

तासगावातील घटना : तिघेही पुसेगावचे; पोलीस दलात खळबळ

तासगाव : तासगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणारे तीन सराईत दरोडेखोर रविवारी मध्यरात्री कोठडी फोडून फरार झाले. जोरदार वारा, पाऊस आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधाराचा फायदा घेत तिघांनी पलायन केले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात उशिराने आला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. कुमार बधू पवार (वय २३), राहुल लक्ष्मण माने (१९), राजेंद्र प्रेमनाथ जाधव (२३, सर्वजण राहणार पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत. जबरी चोरीच्या तपासासाठी आटपाडी पोलिसांकडून न्यायालयाने त्यांना तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. कोठडीची मुदत १ जूनपर्यंत होती. तत्पूर्वीच तिघांनी पलायन केले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके पाठविण्यात आली आहेत. शिवाजी परसू सूर्यवंशी (रा. किंदरवाडी, ता. तासगाव) यांचे रस्त्याकडेला शेत आहे. १६ मे रोजी गाडीवरून जाणाऱ्या तिघांनी त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर सूर्यवंशी शेतात जात असताना, तिघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसडा मारून घेतली आणि तेथून पळून गेले. याबाबत सूर्यवंशी यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानंतर दोनच दिवसांत दिघंची येथे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दरोड्याच्या प्रयत्नात असताना या तिघांना अटक केली. त्यांची बातमी छायाचित्रांसह वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती. ती पाहून सूर्यवंशी यांनी तासगाव पोलिसांत धाव घेऊन या तिघांनीच सोनसाखळी लंपास केली असल्याचे तासगाव पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तासगाव पोलिसांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. २६ मे रोजी हे तिन्ही आरोपी तासगाव पोलिसांच्या ताब्यात सोपविण्यात आले. तिघांना तासगाव न्यायालयाने १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तासगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ब्रिटीशकालीन तुरुंग आहे. या तुरुंगातील एका कोठडीत या तिघांना ठेवण्यात आले होते. कैद्यांच्या बंदोबस्तासाठी हरिभाऊ कदम आणि पाटील हे दोन हवालदार तैनात होते. रविवारी रात्री जोरदार वादळी वारे आणि पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ही संधी साधून रात्री सव्वाबारा ते दीडच्या सुमारास तिघांनी व्हरांडा आणि कोठडीच्या कौलारू छतामध्ये असलेल्या लाकडी फळ्या उचकटल्या. त्यातून ते बाहेर गेले आणि व्हरांड्यावरील कौलांवरून खाली उड्या मारून फरारी झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांची पथके शोधासाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) निवृत्तीची मेजवानी, आरोपींचे पलायन तासगावचे पोलीस निरीक्षक रमेश बनकर, सहायक पोलीस निरीक्षक सयाजी गुजले यांच्यासह सहाजणांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम रविवारी (दि. ३१) सायंकाळी पार पडला. त्यानंतर रात्री खास मेजवानीचे आयोजन केले होते. याच रात्री आरोपींनी पलायन केल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती. दोन पोलीस निलंबित तासगाव पोलीस ठाण्यात कोठडीबाहेर संशयितांवर नजर ठेवण्यासाठी हवालदार हरिभाऊ कदम व सुकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली. दोघांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश विट्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांना दिले आहेत. तीन गुन्हेगारांनी पलायन केल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्याकडे सोपविला आहे. शोधासाठी सहा पथके पळून गेलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सहा पथके तत्काळ पाठविण्यात आली आहेत. मणेराजुरी, किन्नरवाडी, पुसेगाव, कुमठे फाटा या परिसरात ही पथके पाठविण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन पथके सातारा व कऱ्हाडला रवाना झाली आहेत. सातारा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे. पुसेगाव येथील त्यांच्या घरावरही छापे टाकले, मात्र ते घरी गेले नसल्याची माहिती मिळाली आहे. सातारा जिल्ह्यात ते आश्रय घेतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पथकांनी तिथे तळ ठोकला आहे.