शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तासगावातील स्वच्छतेच्या वादग्रस्त ठेक्याची सखोल चौकशी होणार... मुख्याधिकाºयांचा इशारा : राष्टÑवादीच्या संस्थांचे बोगस दाखले जोडून घेतला ठेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:35 IST

तासगाव : तासगाव नगरपालिकेकडील स्वच्छतेचा कोट्यवधी रुपयांचा ठेका मिळविण्यासाठी ठेकेदाराने बोगसगिरी केल्याचे चव्हाट्यावर आले आहे.

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव नगरपालिकेकडील स्वच्छतेचा कोट्यवधी रुपयांचा ठेका मिळविण्यासाठी ठेकेदाराने बोगसगिरी केल्याचे चव्हाट्यावर आले आहे. राष्टÑवादीशी असेलेल्या घरोब्याचा फायदा घेत, शहरातील राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या तीन महत्त्वाच्या संस्थांकडील ठेक्याच्या अनुभवाचे दाखले पालिकेला सादर करण्यात आले आहेत. बोगस दाखले जोडून ठेका घेतल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या ठेक्याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी दिला आहे.

शहरातील स्वच्छतेचा २००७ पासून बीव्हीजी कंपनीकडे असलेला ठेका रद्द करून विद्यमान सत्ताधाºयांनी, राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयाला ठेका दिला. ठेका देत असताना ठेकदाराने नियमांची अंमलबजावणी केली नाही. याउलट ठेका पदरात पाडून घेण्यासाठी अनेक बोगस कागदपत्रे जोडण्यात आल्याचे चव्हाट्यावर आले आहे. तासगाव नगरपालिकेचा स्वच्छतेसाठीचा महिन्याला ८ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा ठेका होता. हा ठेका मिळविण्यासाठी यापूर्वी या किंमतीएवढा ठेका घेऊन काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक होते.

हा ठेका पदरात पाडून घेण्यासाठी संबंधित ठेकेदाराने राष्टÑवादीशी असलेल्या घरोब्याचा पुरेपूर फायदा करुन घेतला. राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या स्वामी रामानंद भारती सूतगिरणी, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघांकडे ठेका घेऊन काम केल्याचे दाखले पालिकेला सादर करण्यात आले आहेत. वास्तविक या तीनही संस्थांकडे अशाप्रकारचे कोणतेही काम संबंधित ठेकेदाराने केलेले नाही.

दरम्यान, बुधवारी ‘लोकमत’मध्ये ‘कोटीच्या ठेक्यासाठी नियमांच्या चिंधड्या’ या मथळ्याखाली नियमबाह्य ठेकेदारीबाबत बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्याची दखल घेत मुख्याधिकारी वायकोस यांनी करारनाम्यातील सर्व कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे सांगितले. दाखल्यांची तपासणी करण्यासाठी संबंधित संस्थांकडूनही खुलासा मागविण्यात येणार आहे. या प्रकरणात ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी वायकोस यांनी दिला.बिलाबाबत पुनर्विचारठेकेदाराच्या स्वच्छतेबाबतीत अनेक तक्रारी आहेत. नियमानुसार स्वच्छता होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ठेकेदाराने डिसेंबर महिन्यात केलेल्या कामाच्या बिलाबाबत पुनर्विचार करुनच बिल देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी वायकोस यांनी दिली.संस्थांचा मासिक ठेकाराष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या तीन संस्थांचा स्वच्छतेचा ठेका असल्याबाबतचे दाखले जोडण्यात आले आहेत. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचा ३ लाख १३ हजार रुपयांचा, आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघाचा १ लाख २० हजार रुपयांचा आणि स्वामी रामानंद भारती सूतगिरणीचा ६ लाख २६ हजार रुपयांचा मासिक ठेका असल्याची पत्रे पालिकेला सादर करण्यात आली आहेत.राष्टÑवादीचा घरोबा, भाजपची सोयरिक पथ्यावरस्वच्छतेचा ठेका घेतलेला ठेकेदार राष्टÑवादीचा पदाधिकारी आहे. बोगस कागदपत्रे मिळवण्यासाठी त्याला राष्टÑवादीचा घरोबा पथ्यावर पडला, तर ठेका मिळवण्यासाठी भाजपच्या एका नगरसेवकासोबत केलेली ‘आर्थिक’ सोयरिक सोयीस्कर ठरली.