शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीच्या योजना तरीही जिल्ह्यात ४० गावांना दूषित पाणी

By अशोक डोंबाळे | Updated: May 13, 2023 17:04 IST

भारत निर्माण, जल जीवन मिशन, जलस्वराज्य आदींसह विविध योजनांच्या माध्यमातून गावांना कोट्यवधी रुपयांच्या पाणी योजना तयार केल्या आहेत.

सांगली : कोट्यवधी रुपयांच्या पाणी योजना करूनही जिल्ह्यातील ४० गावांतील लाखो नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास खासदार, आमदार आणि स्थानिक नेत्यांना वेळ नसल्याबद्दल नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. अनेक गावच्या पाणी योजनांची पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे.

भारत निर्माण, जल जीवन मिशन, जलस्वराज्य आदींसह विविध योजनांच्या माध्यमातून गावांना कोट्यवधी रुपयांच्या पाणी योजना तयार केल्या आहेत. या पाणी योजनांसाठी सक्तीने पाणी शुद्धीकरण यंत्रणा दिली आहे. तरीही गावांना शुद्ध पाणी मिळत नसल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजार होत असतानाही पाणी शुद्धीकरणाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. पण, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक महिन्याच्या अहवालात काही गावांचा दूषित पाणी म्हणून समावेश असतोच. तरीही या गावांकडून पाणी शुद्धीकरणाबाबत कोणतीही कारवाई होत नाही, याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.या गावांत दूषित पाणी

आटपाडी तालुका : दिघंची, निंबवडे, झरे, कामत, तळेवाडी, पात्रेवाडी, जत : जाडरबोबलाद, शेड्याळ, मिरज : मालगाव मल्लेवाडी, बोलवाड, कर्नाळ, हरिपूर, निलजीबामणी, आरग, खटाव, सलगरे, तानंग, पलूस : सूर्यगाव, धनगाव, बांबवडे, वाळवा : साटपेवाडी, विठ्ठलवाडी, शेणे, कोळे, ऐतवडे खु., केदारवाडी, येलूर, तांदुळवाडी., शिराळा : फुपेरे, धसवाडी, बेलेवाडी, खुजगाव, भैरेवाडी, घागरेवाडी, खराळे, कडेगाव तालुका : खंबाळे, शिरगाव, वांगी, नेवरी.गावांना जिल्हा परिषदेकडून नोटिसा

दूषित पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असलेल्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामपंचायतींनी पाणी शुध्दीकरणाला प्राधान्य द्यावे, अन्यथा दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी दिला आहे.नेत्यांना बाटली बंद, नागरिकांना दूषित पाणी'

नेते बाटली बंद पाणीच पित आहेत. यामुळे या नेत्यांना दूषित पाण्याचे परिणाम काय कळणार, असा सवाल गावातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तरीही खासदार, आमदार आणि स्थानिक नेतेही लक्ष देत नाहीत, याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Sangliसांगली