शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतील सव्वा कोटींची कामे केली मॅनेज, सांगली महापालिकेत मोठा गैरव्यवहार

By शीतल पाटील | Updated: October 7, 2023 16:44 IST

शहर अभियंत्याची विभागीय चौकशी तर नऊ जणांना निलंबनपूर्व नोटीस

सांगली : शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतील सव्वा कोटी रुपयांची कामे मॅनेज करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने महापालिका प्रशासन हादरले आहे. या प्रकरणी आयुक्त सुनील पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शहर अभियंत्यांना विभागीय चौकशी का करू नये, अशी नोटीस बजावली आहे. तर नगर अभियंता, शाखा अभियंत्यासह लिपिक अशा नऊ जणांना निलंबनपूर्व नोटीस दिली आहे. येत्या ४८ तासात कारणे दाखवा नोटिशीचा खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन कॅप)मधील हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेला निधी देण्यात आला आहे. यातील सव्वा कोटी रुपयांची फुटपाथवर पेव्हिंग ब्लाॅक बसविण्याची १३ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. दहा लाखांच्या आतील अंदाजपत्रक तयार करून निविदा मॅनेज करण्यात आल्याचा आक्षेप नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी घेतला होता. त्याची दखल घेत आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. ही सर्व कामे रद्द केली.आता आयुक्तांनी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नगर अभियंता परमेश्वर हलकुडे, भगवान पांडव, स्थापत्य अभियंता दीपक पाटील, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी, प्रभारी शाखा अभियंता महेश मदने यांच्यासह चारही प्रभाग समितीकडील निविदा प्रक्रिया पाहणाऱ्या लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या ४८ तासात नोटिशीवर खुलासा करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगली