शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत काळ्या खणीत मृत माशांचा खच  - वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 11:12 IST

येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रविवारी खणीत हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती.

सांगली : येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रविवारी खणीत हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती. नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून तक्रार केली; पण दिवसभर आरोग्य विभागाचे कर्मचारी काळ्या खणीकडे फिरकले नाहीत. 

काळ्या खणीत मासे मृत झाल्याचे रविवारी सकाळी आढळून आले. सकाळपासूनच वडर कॉलनी, सुंदरनगर परिसरात दुर्गंधी पसरली होती. नेमके मासे कशामुळे मृत झाले, याची चर्चा सुरू होती. काळ्या खणीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आहे. त्यात काहीजण मासेमारीही करतात. अज्ञाताकडून पाण्यात रसायन अथवा गूळ टाकला असावा, त्यामुळे मासे मृत झाल्याचे बोलले जात आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर नागरिकांनी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली.

निंबाळकर यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांना काळ्या खणीच्या स्वच्छतेची सूचना केली. पण रविवारी आरोग्य विभागाकडील कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने दिवसभर कोणीच काळ्या खणीकडे फिरकले नाही. सोमवारी मृत मासे बाहेर काढले जातील, असे आरोग्य अधिकाºयांकडून सांगण्यात आले. काळ्या खणीच्या सुशोभिकरणाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तसा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठविला आहे. पण त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव आहे. सत्ताधारी भाजपनेही काळ्या खणीच्या सुशोभिकरणाची ग्वाही दिली आहे. तातडीने सुशोभिकरणाचे काम सुरू झाल्यास काळ्या खणीचे प्रदूषण थांबेल आणि नागरिकांसाठी एक पर्यटनस्थळ निर्माण होईल, असे निंबाळकर म्हणाल्या.

टॅग्स :fishermanमच्छीमारSangliसांगली