नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील नेर्ले-कासेगाव रोडवर असणाऱ्या रस्त्यावर विजेची व्यवस्था नसल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी त्रास होत आहे. तरी या रस्त्यावर विजेची व्यवस्था करावी, यासाठी पैलवान ग्रुपने सरपंच छायाताई रोकडे यांना निवेदन दिले आहे.
गेली दोन-तीन वर्षे ग्रामपंचायतीने उभे केलेले विजेचे खांब मळ्यातील कट्टूर ओढ्यानजीक पडलेले आहेत. त्याच्या तारा तुटलेल्या आहेत. याकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. रात्री-अपरात्री नेर्ले गावातून मळ्याकडे येताना वीज नसल्याने विशेषत: महिलांच्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पैलवान ग्रुपने सरपंच यांच्याकडे या रस्त्यावर विजेची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन करू, अशी भूमिका घेतली आहे. या निवेदनावर प्रदीप पाटील, सुनील पाटील, दिग्विजय पाटील, दादासाहेब ताटे, हर्षद पाटील यांच्यासह दहा ते बाराजणांच्या सह्या आहेत.
फोटो - ०४०२२०२१-आयएसएलएम-नेर्ले निवेदन न्यूज
नेर्ले येथील विजेची व्यवस्था करण्यासाठी निवेदन देताना पैलवान ग्रुचे सदस्य.