पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील ग्रामस्थ पाणीपुरवठा आणि विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा व विद्युतपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत आणि महावितरण कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जाणार नाही, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जाते आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पेठ गावाला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो आहे. तोसुध्दा एक दिवस आड, तोही सुरळीत होत नाही. गेल्या दोन तीन महिन्यांपासून चार दिवसाआड ताही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठाही दिवसातून चार ते पाच वेळा खंडित होत आहे. पावसाळा सुरू झाली की रात्रभर वीज गायब होते. या आवश्यक व मूलभूत गरजा पूर्ण केव्हा होतील, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचाराला आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ग्रामस्थांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.