शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या काहीलीने वाढली शीतपेयांची मागणी, लिंबू- कोकम सरबताला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 13:42 IST

Temperature Sangli- ऊन, प्रचंड उकाडा, घशाला सतत पडणारी कोरड यामुळे सांगलीत जागोजागी थंडपेयाची मागणी वाढली आहे. यामुळे लोक आता शीतपेयाच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. यामुळे स्टॉलधारकांनी शीतपेय विक्रीवर विशेष भर दिल्याचे शहरात दिसून येत आहे.

ठळक मुद्दे लिंबू व कोकम सरबताला अधिक पसंतीसावधगिरी बाळगण्याचा डॉक्टरांचा सल्ला

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली : ऊन, प्रचंड उकाडा, घशाला सतत पडणारी कोरड यामुळे सांगलीत जागोजागी थंडपेयाची मागणी वाढली आहे. यामुळे लोक आता शीतपेयाच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. यामुळे स्टॉलधारकांनी शीतपेय विक्रीवर विशेष भर दिल्याचे शहरात दिसून येत आहे.

कोरोनामुळे थंड पिण्यावर लोकांनी नियंत्रण ठेवले असले तरी ऊन आणि गरम वातावरणामुळे त्यांचे पाय थंडपेय विक्री करणाऱ्या  दुकानाकडे वळले आहेत. सामान्य लोकांचे  लिंबू पाणी व कोकम सरबतला अधिक पसंती आहे. सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहेत. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक उपनगरात गाडीने प्रवास करतात. विशेषता सकाळी सांगलीतील विश्रामबाग, काँग्रेस भवन, एसटी स्टँड, टिळक चौक रोड, कुपवाड या भागातून लोक गावात येत असतात.

उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे  लोक अक्षरशः हैराण होत आहेत. त्यांचा जीव कासावीस होतो आहे. यामुळे लोक आता पहिल्यांदा शीतपेयांचे स्टॉलकडे वळतात. शीतपेयामध्ये थंड पाणी, लिंबूसोडा, इतर कोल्ड्रिंकची मागणी नेहमीपेक्षा २० टक्क्यानी वाढली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात खाद्यपदार्थांपेक्षा  शीतपेयाची जास्त मागणी असते.

काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्टॉलवर मोसंबी, गाजर तसेच इतर फळांचा ज्युस पिण्यासाठी  लोक गर्दी करत असल्याचे दिसत आहे, तर बच्चेकंपनी कालाखट्टा, कच्ची कैरी,मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसत आहे.

उकाडा व त्यामुळे त्वचेला होणारा त्रास लक्षात घेत महिलावर्ग तोंडाला स्कार्प बांधून प्रवास करणे पसंद करत आहेत. मार्च महिन्याचे तापमान साधारणपणे ३० ते ३२ डिग्रीच्या आसपास पोचले असून अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. यामुळे उन्हाळ्याच्या काहिलीने शीतपेयांची मागणी वाढली आहे. डॉक्टरांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. 

उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्याचा परिणाम शरीरावर होतो. यासाठी नारळ पाणी, आवळा, लिंबू पाणी यांचे जास्त सेवन करावे. यात जीवनसत्त्व तसेच मूलद्रव्ये असतात. लहान मुले व वृद्ध नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आग्रह करावा. त्यामुळे पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होईल. फ्रीजमधील पाणी घातक असून यामुळे कशाला विकार होऊ शकतात, बाहेरील अशुद्ध पाणी शक्यतो टाळावे. अन्यथा काविळ, पोटाचे विकार, डोके दुखणे इत्यादी आजार होऊ शकतात. - डॉ. विजया सुवास पाटील, सांगली.  

टॅग्स :TemperatureतापमानSangliसांगली