शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

मांगलेची शाळा खासगीच्या घशात घालण्याचा डाव

By admin | Updated: June 24, 2015 00:41 IST

लोकप्रतिनिधींचा आरोप : आंदोलनाचा इशारा

मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील ४५० पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेची शाळा बंद पाडून, एका खासगी शाळेला मदत करण्यासाठी शाळेच्या सर्व वर्गखोल्या भाड्याने देण्याचा घाट शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यांची चौकशी करुन कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती प्रल्हाद पाटील, सरपंच दत्तात्रय पाटील व उपसरपंच संदीप तडाखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.मांगले येथील फत्तेसिंगराव नाईक मंडळ संचलित आदर्श बालक मंदिर शाळेच्या व्यवस्थापनाने केंद्रशाळा असणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वर्गखोल्यांची मागणी शिराळ्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या पत्राच्याआधारे या अधिकाऱ्याने चौकशी न करताच, वर्गखोल्या खासगी शाळेला देण्यात याव्यात, असा पत्रव्यवहार केला आहे. शाळेला पत्र प्राप्त होताच व्यवस्थापनाला माहिती दिली. या प्रकाराबद्दल समितीने संताप व्यक्त केला. जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या साडेचारशे असताना आणि शाळांतील मुलांना वर्गखोल्या कमी पडत असताना, गटशिक्षण अधिकाऱ्यांनी लावलेला हा जावईशोध म्हणजे संशोधनाचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे खासगी शाळेने ११ जूनरोजी मागणी केली व त्याअगोदरच ३ आॅगस्टची तारीख टाकून मुख्याध्यापकांकडे खोल्यांचा खुलासा मागवून भीमपराक्रम केला आहे, असा खुलासा प्रल्हाद पाटील, सरपंच दत्तात्रय पाटील यांनी केला. (वार्ताहर) चौकशीची मागणीस्वत:च्या शासनाच्या शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न करून खासगी शाळा चालविण्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांचा स्वार्थ काय? याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर या शाळाखोल्या खासगी शाळेला देऊन शासनाच्या शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.