जत : जत नगर परिषद हद्दीतील जयहिंद चौक ते गंधर्व चौक तसेच विद्यानगर येथील निकृष्ट रस्ते कामाची चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे.
ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शहरातील जयहिंद चौक ते गंधर्व चौक या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाची कामे होऊन सहा महिनेही झाली नाहीत, तोच या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हे काम शेगाव येथील ठेकेदार महादेव साळुंखे यांनी घेतले असले तरी प्रत्यक्षात हे काम डफळापूर ठेकेदार आवाण्णा तेली यांनी केले आहे. काम घाईघाईत निकृष्ट व दर्जाहीन केले आहे.
सर्व कामाची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करावी व दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.