शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बोगस प्रयोगशाळांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ, कारवाईची मागणी 

By संतोष भिसे | Updated: March 11, 2023 18:37 IST

आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांनी कारवाई थांबवली?

सांगली : जिल्ह्यातील बोगस प्रयोगशाळा चालकांविरोधात कारवाईची मागणी प्रयोगशाळा व्यवसायिकांच्या संघटनेने केली आहे. कारवाईचे आदेश वरिष्ठ स्तरावरुन आल्यानंतरही कारवाई केली जात नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  मंगळवारपासून (दि. १४) उपोषणाचा निर्णय हेमंत चौगुले यांनी घेतला आहे.महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजीस्ट ॲण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अवैध प्रयोगशाळा चालकांना बोगस डॉक्टर ठरवून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात म्हंटले आहे की, पॅथॉलॉजिस्टशिवाय चालवल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा अवैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यांच्यावर कारवाईची जबाबदारी जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर समितीची आहे. सांगली जिल्ह्यात मोठ्या संख्येने बोगस प्रयोगशाळा कार्यरत आहेत. रुग्णांच्या आरोग्याला हानीकारक असणारे चुकीचे चाचणी अहवाल देत आहेत. निदानास विलंब, चुकीचे निदान आदी कारणांनी रुग्णांच्या मृत्यूची भिती आहे.त्यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक व महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे आदेश शासनाने दिले होते, तरीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बोगस प्रयोगशाळा जोमात सुरु आहेत. रुग्णांची फसवणूक सुरु आहे. याविरोधात हेमंत चौगुले यांनी मंगळवारपासून (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रयोगशाळा चालक संघटनेने पाठींबा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांनी कारवाई थांबवली?संघटनेने निवेदनात म्हंटले आहे की, बोगस प्रयोगशाळांवर कारवाईचे आदेश येऊनही पालकमंत्री सुरेश खाडे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या तोंडी सांगण्यावरुन कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :Sangliसांगली