इस्लामपूर येथे रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन उपमुख्य अधिकारी प्रमिला माने-पाटील यांना देण्यात आले. यावेळी गजानन पाटील, हीना खलिफा, रियाज तांबोळी, पप्पू पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील मुख्य भाजी मंडईत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी रस्त्यावर बसून भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी या भाजी विक्रेत्यांनी पालिकेच्या उपमुख्य अधिकारी प्रमिला माने-पाटील यांना निवेदन दिले.
गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजी विक्रेत्यांनी मोर्चा काढला. रस्त्यावर होणारी बेकायदा भाजी विक्री बंद करावी, या विक्रेत्यांना अधिकृत भाजी मंडईमध्ये बसविण्यात यावे, मुख्य भाजी मंडईची स्वच्छता करून दररोज औषध फवारणी करावी, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी अवधूत पावणे, रियाज तांबोळी, जितेंद्र माने, पप्पू पाटील, हीना खलिफा, सुनीता पाटील, अभिजित टिबे, अरविंद पाटील, शंकर जाधव, भालचंद्र पवार उपस्थित होते.