शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतून ५३९ स्लॅबच्या प्लेटा जप्त : खुनाचा बनाव करणारा संतोष पवार पसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:50 IST

सांगली : कर्नाळ रस्त्यावर खुनाचा बनाव करणाऱ्या कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील संतोष जाधव याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात संजयनगर ...

ठळक मुद्देदोघांना अटक ; पोलिसांकडून शोध सुरू

सांगली : कर्नाळ रस्त्यावर खुनाचा बनाव करणाऱ्या कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील संतोष जाधव याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात संजयनगर पोलिसांना सोमवारी यश आले. त्यांच्याकडून ५३९ स्लॅबच्या प्लेटा जप्त केल्या आहेत. या प्लेटा त्यांनी मिरजेत भंगार विक्रेत्याकडे ठेवल्या होत्या.

अमित साताप्पा गोंधळी (वय २५) व अविनाश साताप्पा गोंधळी (२०, दोघे रा. तेरवाड, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही सख्खे भाऊ आहेत. गेल्या आठवड्यात कर्नाळ रस्त्यावर सावर्डेकर यांच्या शेताजवळ एक बेवारस दुचाकी सापडली होती. दुचाकीवर रक्ताचे डाग आढळले होते. तसेच एक पिशवी होती. त्यामध्ये संतोष जाधव नावाचे पॅनकार्ड सापडले होते. हा प्रकार पाहून खून झाल्याची अफवा पसरली होती.

प्रसारमाध्यमातून याचे वृत्त प्रसिद्ध होताच, बांधकाम व्यावसायिकांनी संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पॅनकार्ड सापडलेली संतोष जाधव ही व्यक्ती कुरुंदवाडची असल्याचे सांगितले. तसेच त्याने स्लॅबच्या प्लेटा भाड्याने नेऊन त्यांची परस्पर विक्री केल्याचे सांगितले. याप्रकरणी रमेश खरमाटे (अभयनगर) व नागेश माने (कुपवाड) यांनी फिर्याद दिली होती. दोघांच्या अनुक्रमे नऊशे व सहाशे प्लेटा त्याने भाड्याने नेल्या होत्या. त्या परतही केल्या नाहीत व भाडेही दिले नव्हते.

गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच संतोष जाधव पसार झाला. त्याचे साथीदार अमित व अविनाश या दोघांशी संपर्क करुन, त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक केली.चौकशीत त्यांनी संतोष जाधव याच्या सांगण्यावरुन ५३९ प्लेटा मिरजेत भंगार विक्रेत्याकडे ठेवल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्या पथकाने सोमवारी दुपारी भंगार विक्रेत्याकडे छापा टाकून ५३९ प्लेटा जप्त केल्या. फरार संतोष जाधव याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.चार दिवसांची पोलीस कोठडीअटकेत असलेल्या गोंधळी बंधूंना सोमवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दोघांची कसून चौकशी सुरु आहे. फरार असलेला संतोष जाधव सापडल्यानंतर तपासाला आणखी गती मिळेल, तसेच प्लेटाही जप्त करण्यात यश येईल, असे तपास अधिकारी काकासाहेब पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजी