मिरज : मिरजेत गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी व कमानीचे साहित्य हटविले नसल्याने विविध पक्ष, संघटनांच्या आठजणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे लिपिक आर. एन. रखवालदार यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक मार्गासह विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यासाठी महापालिकेने दि. १२ पर्यंत परवानगी दिली होती. दि. १२ रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या आदेशानंतर स्वागत कमानीवरील फलक व प्रतिमा हटविण्यात आल्या. याप्रकरणी मनसेचे झाकीरहुसेन उस्मान बेपारी, धर्मवीर संभाजी मंडळाचे सूर्यकांत किसन शेंगणे, विश्वशांती मंडळाचे राजेश बाबूराव कोरे, हिंदू एकता आंदोलनाचे विजय चंद्रकांत शिंदे, नानासाहेब मंडळाचे गणेश अशोक यादव, शिवसेनेचे आनंद रामसिंग रजपूत, विश्वश्री पैलवान मंडळाचे किरण हिरवे, हिंदू- मुस्लिम गणेश मंडळाचे रवींद्र पांडुरंग पवार, (सर्व रा. मिरज) या आठजणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेने पोलिसांत फिर्याद दिल्याने कमानीचे सहित्य रस्त्यावरून हटविण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ उडाली होती. (वार्ताहर)
स्वागत कमानी हटविण्यास विलंब; आठजणांविरुध्द गुन्हा
By admin | Updated: September 15, 2014 00:03 IST