शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

सांगली जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांच्या प्रमाणात घट

By admin | Updated: December 1, 2014 00:14 IST

प्रभावी जनजागृती : तपासणी केलेल्या व्यक्तींमधील बाधित व्यक्तींचे प्रमाण २.४८ टक्क्यांवर, आठ वर्षात झाली संख्या कमी

नरेंद्र रानडे - सांगली -कधी काळी एचआयव्हीमध्ये राज्यात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात प्रभावी जनजागृतीचे परिणाम दिसू लागले आहेत. २००६ मध्ये सांगली जिल्ह्यात तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी एचआयव्ही बाधितांचे प्रमाण ३४.७४ टक्के होते. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जागृती केल्यामुळेच यंदा आॅक्टोबर २०१४ अखेर या प्रमाणात तब्बल ३२.२६ टक्क्यांनी घट होऊन आॅक्टोबर २०१४ अखेर ते २.४८ टक्के इतके झाले आहे. एड्सविषयी लोकांच्या मनात असलेली भीती नाहीशी व्हावी आणि अधिकाधिक जणांनी विनासंकोच एचआयव्हीची चाचणी करावी, यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा ‘शून्य गाठणे’ (गेटिंग टू झिरो) ही एड्स दिनाची संकल्पना आहे. एचआयव्ही बाधित व्यक्तींचे प्रमाण शून्यावर आणणे, हा संकल्पनेमागील उद्देश आहे. एड्स समाजातून हद्दपार व्हावा यासाठी शासनाप्रमाणेच स्वयंसेवी संस्थांचे देखील मोठे योगदान आहे. प्रामुख्याने स्वयंसेवी संस्था या महाविद्यालयीन परिसर, वेश्या वस्ती, ट्रकचालक, परराज्यातून येणारे कामगार यांच्यामध्ये जागृती करीत आहेत. यामध्ये सातत्य असल्याने एचआयव्हीची तपासणी करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्यांचा तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे, त्यांना शासनाच्या एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधे देण्यात येत आहेत. जागृतीच्या माध्यमातून एचआयव्ही म्हणजे आजार नसल्याचेही नागरिकांच्या मनावर बिंबविण्यात येत आहे. एचआयव्हीबाधितांनी नियमित औषधे घेणे आवश्यक आहे. मोफत उपचार असूनही काहीजण नियमित औषधे घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याकरिता मागील महिन्यापासून आम्ही एचआयव्ही बाधितांच्या घरी जाऊन त्यांना निरोगी आयुष्यासाठी पूर्ववत औषधे सुरू करण्याची विनंती करीत आहोत.- विवेक सावंत, कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष. आई एचआयव्ही बाधित असल्यास नवजात बालकाला एचआयव्हीची लागण होऊ नये, याची दक्षता घेण्यात येते. याकरिता प्रसुतीच्या दुसऱ्या टप्प्यात आईला टीएलसी टॅब्लेट दिल्या जातात, तर बालकाला नेव्हीसिरपचा डोस दिला जातो. यामुळे बालकाला एचआयव्हीची लागण होऊ शकत नाही.- प्रमोद संकपाळ, पर्यवेक्षक जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष. एचआयव्ही हद्दपार होत आहे...वर्षतपासणी बाधितटक्केवारी२००६६४९९२२५८३४.७४२००९२९२५७३१८६१०.८९२०१२४१९२२२२११५.२७२०१४५३३६६१३२६२.४८(आॅक्टोबर अखेर)गरोदर मातांमधील प्रमाणातही घटवर्षतपासणी बाधित टक्केवारी२००६७८३५१८४२.३५२००९१९०४२१५१०.७९२०१२३५४०४७५०.२१२०१४४४२७९५२०.१२(आॅक्टोबर अखेर)