शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
2
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
3
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
4
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
5
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
6
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
7
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
8
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
9
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
10
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
11
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
12
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
13
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
14
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
15
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
16
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
17
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
18
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
19
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
20
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
Daily Top 2Weekly Top 5

गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा--धार्मिक सलोखा सर्वांनीच राखला पाहिजे: इमाम उमेरअहमद इलियासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:41 IST

गाय हिंदूंच्या धार्मिक आस्थेचा विषय असल्याने मुस्लिमांनीही त्याचा सन्मान केला पाहिजे. केंद्र सरकारने गाईला राष्ट्रीय पशू घोषित करावे,

गाय हिंदूंच्या धार्मिक आस्थेचा विषय असल्याने मुस्लिमांनीही त्याचा सन्मान केला पाहिजे. केंद्र सरकारने गाईला राष्ट्रीय पशू घोषित करावे, अशी मागणी अखिल भारतीय इमाम संघटनेचे अध्यक्ष डॉ. इमाम उमेरअहमद इलियासी (दिल्ली) यांनी केली. मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यास भेट देण्यासाठी आलेल्या इमाम इलियासी यांच्याशी मुस्लिमांच्या प्रश्नांबाबत साधलेला थेट संवाद...प्रश्न : गोरक्षेच्या नावावर देशात सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत तुमचे काय मत आहे?उत्तर : गोरक्षा हा धार्मिक आस्थेचा विषय आहे. या विषयाशी हिंदूंची आस्था जोडलेली असल्याने मुस्लिमांनीही त्याचा सन्मान केला पाहिजे. मुस्लिम गाय कापत नाहीत व खात नाहीत. याबाबत केवळ अपप्रचार सुरू आहे. केंद्र शासनाने गाईला राष्टÑीय पशुचा दर्जा देऊन गाईचे संरक्षण करावे. आमची त्यास कोणतीही हरकत नाही. मुस्लिमांनी हिंदूंसोबत धार्मिक सलोखा टिकवून त्यांचा आदर केल्यास हिंदूंकडूनही त्यांना असेच प्रेम मिळेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे.प्रश्न : केंद्रातील भाजप शासनाचा कारभार कसा आहे?उत्तर : केंद्रातील भाजप सरकारचा कारभार ठीक सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ अशी घोषणा दिली होती. या घोषणेप्रमाणे कारभार केला पाहिजे. सर्वधर्मियांचा विकास व्हावा, यासाठी सर्वांचेच चांगले विचार असले पाहिजेत. यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दिला पाहिजे. या घोषणेबाबत टीका-टिप्पणी करून जाती-धर्मात विभाजन करण्याचे काम राजकीय मंडळी करीत आहेत. मात्र धर्माचे व धर्मगुरूंचे काम सर्वांना एकत्र आणण्याचे व जातीय सलोखा कायम ठेवण्याचे आहे. धर्म, धार्मिक आस्था, परंपरा वेगळ्या असल्या तरी, आम्ही सर्वधर्मीय एकत्र आहोत. देशाला एकतेची आवश्यकता आहे.प्रश्न : देशातील मशिदींच्या इमामांची काय अवस्था आहे?उत्तर : भारतात सुमारे साडेपाच लाख मशिदी व साडेसात लाख मंदिरे आहेत. मशिदीत धर्मगुरू म्हणून काम करणाºया इमामांच्या वेतनाची समस्या कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने इमामांना प्रथम श्रेणी अधिकाºयाचा दर्जा देऊन आठव्या वेतन आयोगाप्रमाणे दरमहा ८० हजार रूपये वेतन देण्याचा आदेश दिला आहे. मात्र या आदेशाची शासनाकडून अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागू करावा यासाठी इमाम असोसिएशनकडून पाठपुरावा सुरू आहे.प्रश्न : तीन तलाक विधेयकाबाबत तुमचे मत काय आहे?उत्तर : तीन तलाकबाबत देशात विनाकारण चर्चा सुरू आहे. याऐवजी विवाहाची व पती-पत्नीला जोडण्याबाबत चर्चा झाली पाहिजे. तीन तलाक विधेयकाचा सरकारचा निर्णय आहे; मात्र या विधेयकात सुधारणा करून स्त्री व पुरूष या दोघांनाही त्याचा लाभ होईल, अशा तरतुदी केल्या पाहिजेत.प्रश्न : मुस्लिमांचे हितरक्षण करणारा कोणता पक्ष आहे?उत्तर : मुस्लिमांसाठी सर्वच पक्ष चांगले आहेत. पक्ष सत्तेवर येतात-जातात, मात्र राष्टÑहित व देशाला विकासाकडे नेणाºया राजकीय पक्षांना समर्थन दिले पाहिजे. मात्र राजकीय पक्ष जाती-धर्मांत विभाजन व ध्रुवीकरणाचे राजकारण करतात. राम मंदिराचा प्रश्न सोडविण्यासाठी धर्म हिताऐवजी राष्टÑहिताचा निर्णय घ्यावा. केवळ एक धर्म खूश होईल असा निर्णय घेण्यात येऊ नये. देशाच्या विकासासाठी धार्मिक एकता आवश्यक आहे, हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.प्रश्न : काश्मीर समस्येबाबत कोणती उपययोजना केली पाहिजे ?उत्तर : काश्मीरमध्ये शांततेसाठी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन विभाजनवादी नेत्यांवर शासनाने कारवाई करावी. जोपर्यंत या उपययोजना होत नाहीत, तोपर्यंत काश्मीरमध्ये शांतता निर्माण होणार नाही. काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचे समर्थन करणाºया फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांनी पाकिस्तानात निघून जावे. काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे व यापुढेही राहील.                                                                                                                                              - सदानंद औंधे, मिरज