शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

‘अमृत’च्या दरवाढीवरून स्थायी समितीत वादंग, सांगली महापालिका : नगरसेवक आक्रमक; वाढीव दराचा बोजा कुणावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:26 IST

सांगली : मिरजेच्या अमृत पाणी योजनेच्या वाढीव दराच्या निविदेमुळे महापालिकेवर साडेबारा कोटींचा बोजा पडणार आहे. या वाढीव दराची जबाबदारी कोणाची?

सांगली : मिरजेच्या अमृत पाणी योजनेच्या वाढीव दराच्या निविदेमुळे महापालिकेवर साडेबारा कोटींचा बोजा पडणार आहे. या वाढीव दराची जबाबदारी कोणाची? असा सवाल करीत गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. वाढीव दराची जबाबदारी प्रशासनावर टाका, अशी मागणीही करण्यात आली. तर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी वाढीव दराबाबत शासनाशी पुन्हा पत्रव्यवहार केल्याचे सांगत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्तांच्या उपस्थितीमुळे सभा तब्बल तीन तास सुरू होती. स्वाभिमानीचे नगरसेवक शिवराज बोळाज यांनी अमृत योजनेच्या निविदेचा प्रश्न उपस्थित केला. बोळाज म्हणाले की, मिरजेच्या अमृत योजनेत महापालिकेला २६ कोटी रुपये हिस्सा घालावा लागणार आहे. त्यात साडेआठ टक्के जादा दराची निविदा आल्याने आणखी साडेबारा कोटींचा बोजा पडणार आहे.

सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वाढीव निविदेला महासभा, स्थायी समितीने विरोध केला आहे. स्थायी समितीने तर या ठेकेदारीसंदर्भात ठरावच कायम केलेला नाही. असे असताना प्रशासनाने परस्पर ठेकेदाराला वर्कआॅर्डरही दिली आहे. तांत्रिक काहीच न समजणाºया उपायुक्तांनी ती वर्कआॅर्डर दिली. साडेबारा कोटीच्या वाढीव दराची जबाबदारी कोणाची? असा सवाल केला.

यावर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी १४ व्या वित्त आयोगातून हा निधी वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावरून पुन्हा वाद उफाळला. सातपुते, बोळाज म्हणाले, महापालिकेला स्वत:चा हिस्सा यातूनच घालायचा आहे. यापूर्वीच साडेपाच कोटी रुपये वर्ग केले आहेत. पुन्हा हा बोजा कोठून सोसणार? असा सवाल केला. खेबूडकर म्हणाले, वाढीव दरासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही देत सदस्यांची बोळवण केली. अखेर सदस्यांनी वाढीव खर्चाची जबाबदारी स्थायी समितीवर येऊ नये, प्रशासनावरच सोपवावी, अशी मागणी केली.महिला स्वच्छतागृहाची : कामे ठप्पचरोहिणी पाटील यांनी महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न मांडला. महिलांसाठी ४२ स्वच्छतागृहे मंजूर झाली. त्यापैकी केवळ आंबेडकर वसतिगृहाजवळील काम सुरू आहे. उर्वरित दहा ते बारा स्वच्छतागृहांची कामे रखडली आहेत. स्वच्छतागृहाच्या जागेबाबत विरोध होत आहे. त्यावर काय निर्णय घेणार, असा सवाल केला. याबाबत आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले.स्थायी समितीतील चर्चाशास्त्री उद्यानाला कंपाऊंडचे साडेसहा लाखांचे काम व गुलमोहर कॉलनीतील उद्यान विकसित करण्याचा अवलोकनार्थ आलेला प्रस्ताव सदस्यांनी फेटाळलाहॉटेल, रेस्टॉरंटचा ओला व सुका कचरा गोळा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता, जागा निश्चितीबाबत महासभेत धोरणात्मक निर्णय होणादिवाबत्ती विभागाकडील कामचुकार कर्मचाºयांची बदली करण्याची मागणी. कामे न केल्यास कर्मचाºयांना परत पाठवून ठेका पद्धतीने काम करण्याचे आयुक्तांचे आश्वासनविश्रामबाग परिसरातील दत्तनगर, पार्श्वनाथ कॉलनीतील अपुºया पाणीपुरवठ्याबाबत सात दिवसात नियोजन करण्याचे आदेशशंभर फुटी रस्त्यावरील बंद स्ट्रीट लाईट व भाडेकराराचा अहवाल मागविलामतदार नोंदणीमुळे कर्मचाºयांची अपुरी संख्या असल्याने चौमाही अंदाजपत्रक सादर करण्यास उशीर. २१ डिसेंबरपर्यंत अंदाजपत्रक सादर करण्याची लेखापालांची ग्वाहीआठ महिने प्रश्न प्रलंबिततीन कोटी रुपयांच्या रस्त्यांसह विविध विकासकामांच्या निविदांना प्रतिसाद येत नाही. आठ महिने हा प्रश्न रखडला असूनही प्रशासन सुस्तच असल्याबद्दल नगसेवक दिलीप पाटील यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. या कामाबाबत प्रशासनाने काहीच निर्णय घेतलेला नाही. ही कामे स्थायी समितीकडे पाठविण्याची मागणी केली. निवडणूक तोंडावर असल्याने आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे, असे ते म्हणाले. आयुक्तांनी आठ दिवसांची मुदत द्या, या कालावधित निविदांचा प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर हा विषय स्थायी समितीकडे पाठवू, असे आश्वासन दिले.