शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

काँग्रेसअंतर्गत वाद उफाळला

By admin | Updated: April 10, 2015 01:04 IST

स्थायी समितीत पडसाद : निमित्त इतिवृत्ताचे, कारण निविदेचे, शह-काटशह

सांगली : महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसअंतर्गत वाद उफाळून आला असून शह-काटशहच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे. त्याचा प्रत्यय गुरुवारी स्थायी समिती सभेत आला. नगरसेवक हारुण शिकलगार यांनी, इतिवृत्त अपूर्ण असल्याने सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यात एक कोटी ७२ लाख रुपयांची कामे निविदा पद्धतीने करण्यास मंजुरी दिली असताना, ती विनानिविदा करण्याचा ठराव करण्यात आल्याचे शिकलगार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यातून सभापती संजय मेंढे व शिकलगार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादामुळे रागारागाने सभापतींनी सभा तहकूब करून सभागृह सोडले. सभापती मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता स्थायी समितीची सभा होती. सभा सुरू होताच हारुण शिकलगार यांनी गत सभेचे इतिवृत्त वाचण्याची मागणी केली. अजून इतिवृत्त अपूर्ण असल्याचे सभापतींनी सांगितले. त्यावर शिकलगार आक्रमक झाले. इतिवृत्त पूर्ण झाल्याशिवाय सभा घेऊ नये, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यातच सभेची वेळ सकाळी अकराची असताना दुपारी एकची का करण्यात आली? असा सवालही शिकलगार यांनी केला. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात बैठक असल्याने वेळ बदलल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले. त्यावर शिकलगार यांनी, उपायुक्तांना अधिकार आहेत का? अशा शब्दात हल्ला चढविला. गत महिन्याभरातील स्थायी समिती सभेत एक कोटी ७२ लाख रुपयांची कामे निविदा पद्धतीने करण्यास मंजुरी दिली होती. स्थायीने ठराव मात्र विनानिविदेचा केला आहे. या सभेचे इतिवृत्तही पुढील सभेत मंजूर झाले आहे. असे असताना आज शिकलगार यांनी मंजूर इतिवृत्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या ठरावालाही शिकलगार यांनी विरोध केला. सभापती मेंढे यांनी, इतिवृत्त पूर्ण करूया, सभा होऊद्या, अशी भूमिका घेतली. पण शिकलगार यांनी आपली भूमिका मागे घेतली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी सभा तहकूब केली. (प्रतिनिधी)५महापौरांचा टोलास्थायी सभेत काय घडले, याची माहिती आपण घेत आहोत. इतिवृत्त अपूर्ण असल्याने सभा तहकूब झाल्याचे कळले. राष्ट्रवादीने उगाच आमच्यावर टीका करू नये. कोणी कॉपी करून मेरीटमध्ये येत नाही, असा टोला महापौर विवेक कांबळे यांनी लगाविला.