आष्टा : माजी आमदार विलासरावजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त सांगली राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आष्टा येथील विलासराव शिंदे यांच्या शक्तिस्थळ या स्मारकस्थळी अभिवादन केले.
जयंत पाटील म्हणाले, माजी आमदार विलासराव शिंदे यांचे संघटन कौशल्य वादातीत होते. सत्ता असो वा नसो, त्यांच्याजवळ कार्यकर्त्यांची रीघ लागलेली असायची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी सांगली जिल्हा अध्यक्षपद सांभाळले. अनेक अडचणीच्या वेळी त्यांनी पक्षाला व मला साथ दिली. जिल्ह्यातील सर्वच पक्षात त्यांचे मित्र असल्याने सर्वजण त्यांचा शब्द मानत असत. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, झुंझारराव शिंदे, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे, कारखाना अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील, बाळासाहेब पाटील, कृषिभूषण संजीव माने, संजय पाटील, राहुल महाडिक, निशिकांत भाेसले पाटील, भाग्यश्री शिंदे, धैर्यशील शिंदे, विद्या शिंदे, शालन कदम, डी. बी. पाटील, प्रकाश मिरजकर, नूर मोहम्मद मुल्ला, लियाकत मुजावर, बी. एस. संकपाळ, अभियंता शिरीष सावंत, अल्लाउद्दीन चौगुले, विश्वासराव पाटील, अनिल पाटील, विराज शिंदे, दिलीपराव वग्यानी, रघुनाथ जाधव, संग्राम फडतरे, माणिक शेळके, संभाजी कचरे, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, संगीता सूर्यवंशी, मनीषा जाधव, मंगल सिद्ध, सारिका मदने, पी. एल. घस्ते, शेरनबाब देवळे, तानाजीराव सूर्यवंशी, अर्जुन माने, शैलेश सावंत, सतीश माळी, उदय कुशिरे, शिवाजी चोरमुले, वरदराज शिंदे, विश्वराज शिंदे, नितीन झंवर, डॉ. मनोहर कबाडे, रणधीर नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, अशोक पाटील ,शहाजी पाटील, विकास कदम, अनिल पाटील, डॉ. प्रकाश आडमुठे, डॉ. प्रफुल्ल आडमुठे, वीर कुदळे, रणजित माने, वैभव पवार, संदीप सावंत, अमोल पडळकर, डॉ. तुषार कणसे, दादा शेळके, अभिजित जाचक, राजू इनामदार, सोनाली कुरणे उपस्थित होत्या.
फोटो - १५०२२०२१-आयएसएलएम-आष्टा न्यूज
आष्टा येथे माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या शक्तिस्थळ या स्मारकस्थळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी वैभव शिंदे, विशाल शिंदे, झुंझारराव शिंदे, झुंझारराव पाटील, पी. आर. पाटील उपस्थित होते.