बाबू मिटकरी (रा. चांदुलवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या हौशी मेंढपाळाकडे हा जातिवंत मेंढा होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व पशुपालकांचा हा मोदी बकरा चर्चेचा विषय होता. या उपक्रमासाठी लाखो रुपयांची मागणी होऊनही तो बकरा त्यांनी विकला नव्हता.
सध्या मिटकरी मेंढरे घेऊन पंढरपूर परिसरात आहेत. गेल्या सहा दिवसांपासून हा बकरा आजारी पडला होता. त्याच्यावर पंढरपुरातील डॉक्टरांकडून खूप खर्च करून उपचार करण्यात आले. मात्र, गुरुवारी दुपारी अकरा वाजता या बकऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्यावर आभाळ कोसळले.
कोट
या बकऱ्यावर माझा जीव होता. दीड कोटी रुपयेच काय कितीही पैसे दिले तरी तो मी विकणार नव्हतो. पैशापेक्षा त्याचे गुण महत्त्वाचे होते. तो देखणा होता. कोरोनामध्ये जसे श्वास घ्यायला त्रास होतो तसा त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याने खाणे-पिणे सोडले होते. डॉक्टरांनी निमोनिया झाल्याचे सांगितले. खूप प्रयत्न केले परंतु तो गेला. याचे खूप वाईट वाटते.
- बाबू मिटकरी