शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

By admin | Updated: March 21, 2017 20:18 IST

कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली (टी) येथे चार वर्षाच्या बालकाचा पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतसांगली, दि.21  - कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली (टी) येथे चार वर्षाच्या बालकाचा पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना आजसकाळी साडेसात वाजता घडली. बाबासाहेब राजाराम जगताप असे या बालकाचे नाव असून,या घटनेने करोली परिसरात खळबळ माजली आहे.करोली (टी) येथील जगताप वस्तीवर राजाराम पाटील यांचे कुटुंब राहते. मंगळवारी सकाळी घरातील सगळी माणसे शेतातील ज्वारी काढायला गेली होती. त्यावेळी राजाराम पाटील यांचा चार वर्षांचा मुलगा बाबसाहेब घरी झोपला होता. घराचे दार बंद केले होते, परंतु कडी लावली नव्हती. साडेसात वाजण्याच्या सुमारास एक पिसाळलेले कुत्रे पाटील यांच्या घरात शिरले आणि त्याने झोपलेल्या बाबासाहेबवर प्राणघातक हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या मानेला धरून त्याला फरफटत बाहेर आणले व हल्ला करीत घराच्या मागे नेले.तेथे त्याच्या डोक्यावर, मानेवर, नरड्याला जोरदार चावा घेतला. हे त्याच्या आईने पाहताच पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडातून मुलाला सोडवून घेतले. त्याच्या आईच्या हातालाही कुत्र्याने गंभीर चावा घेतला. गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेबला कवठेमहांकाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी वस्तीवर पसरली. चिडलेल्या जमावाने कुत्र्याला ठार मारले. कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्तहोत आहे.मुलीनंतर बारा वर्षांनी झालेल्या मुलाच्या मृत्यूने शोक अनावर राजाराम पाटील निवृत्त सैनिक आहेत. त्यांना १६ वर्षाची मुलगी असून तिच्या जन्मानंतर १२ वर्षांनी बाबासाहेब याचा जन्म झाला होता. त्याला काळाने असा हिरावून घेतल्याने बाबासाहेबच्या आई, वडिलांचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता.