शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

सहायक फौजदाराचा बंदोबस्तावेळी मृत्यू

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

हृदयविकाराचा झटका

मिरज : मिरजेत युनियन बँकेतील चेस्टच्या बंदोबस्तासाठी असलेल्या प्रदीप के. पाटील (वय ५४, रा. कसबे डिग्रज) या मुख्यालयातील सहायक फौजदाराचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिरजेत किल्ला परिसरातील युनियन बँकेतील चेस्टमध्ये बँकांची रोकड ठेवण्यात येत असल्याने येथे नेहमी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. शनिवारी रात्री प्रदीप पाटील व तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला होते. आज सकाळी सात वाजता प्रदीप पाटील बँकेच्या प्रवेशव्दारात बेशुध्दावस्थेत पडलेले दिसल्यानंतर नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी प्रदीप पाटील यांना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बंदोबस्तावरील सहायक पोलीस फौजदाराचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी रुग्णालयात जाऊन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे प्रदीप पाटील यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. कसबे डिग्रज येथील प्रदीप पाटील विश्रामबाग येथील पोलीस कर्मचारी वसाहतीत रहात होते. पाटील यांच्यासोबत रात्रपाळीच्या बंदोबस्ताला असलेले अन्य तीन पोलीस कर्मचारी बँकेच्या इमारतीत आतील बाजूस असल्याने पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांना समजले नाही. त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने पाटील यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. (वार्ताहर)