शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापुरानंतर मार्केट यार्डात व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:46 IST

सांगली : महापुराच्या प्रलयानंतर बाजारपेठ हळूहळू सावरत असली तरी, मार्केट यार्डातील व्यवहार मात्र, सुरळीत सुरू झाले आहेत. राज्यासह शेजारच्या ...

सांगली : महापुराच्या प्रलयानंतर बाजारपेठ हळूहळू सावरत असली तरी, मार्केट यार्डातील व्यवहार मात्र, सुरळीत सुरू झाले आहेत. राज्यासह शेजारच्या कर्नाटकातून येणाऱ्या शेतीमालाच्या सौद्यासह इतर व्यवहार सुरू झाले आहेत. मार्केट यार्ड वगळता शहरातील इतर बाजारपेठ मात्र अद्यापही पुराच्या सावटाखालीच असल्याचे चित्र आहे.सलग सहा दिवस पुराच्या पाण्याखाली शहरातील ७० टक्क्यांहून अधिक भाग होता. त्यामुळे बाजारपेठेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. शहरातील मार्केट यार्ड व गणपतीपेठ परिसरात सर्वाधिक व्यवहार होतात. यातील मार्केट यार्डाला पुराचा फटका बसला नसला तरी, तेथील व्यवहारावर परिणाम झाला होता. मालाच्या आवक-जावक उलाढालीवरही परिणाम झाल्याने मार्केट यार्डात दररोज अडीच कोटींचे नुकसान झाले होते.या कालावधित बेदाणा, हळद, गुळासह इतर शेतीमालाचे सौदेही बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागले होते. मार्केट यार्डाबरोबरच कोल्हापूर रोडवर असलेला विष्णुअण्णा फळ मार्केट परिसर पाण्याखाली गेल्याने तेथील व्यवहार थांबले होते. या कालावधित कांदा, बटाट्याचे सौदे मार्केट यार्डात होत होते. तरीही फळ मार्केटमधील बहुतांश सौद्यावर अद्यापही परिणाम जाणवत आहे. मार्केट यार्डात अपवाद वगळता वर्षभर हळद, बेदाण्याचे सौदे सुरू असतात. पुराच्या कालावधित आठवडाभर हे सौदे बंद होते. सांगली शहराला जोडणारे प्रमुख रस्ते पाण्याखाली असल्याने बाहेरच्या व्यापाºयांना सांगलीत येणे शक्य नव्हते व खरेदी केलेला मालही नेता येणे शक्य नसल्याने, ही स्थिती निर्माण झाली होती. सध्या बाजारपेठेतील आवक मर्यादित असून त्यास मागणीही त्याच प्रमाणात आहे.