शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

पाण्याच्या पाईपमध्ये आढळली मृत घोरपड

By admin | Updated: December 1, 2014 00:12 IST

जतला प्रकार : वसंतनगर परिसरात पुरवठा बंद

जत : जत नगरपालिकेच्यावतीने पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनमधून दोन दिवसांपूर्वी मृत झालेली घोरपड वाहत आल्याने शहरातील प्रभाग क्रमांक १ व वसंतनगर देवकर गल्ली येथील पाणी पुरवठा बंद झाला होता. नगरसेवक परशुराम मोरे यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाईप फोडून मृत घोरपडे बाहेर काढली. या घटनेमुळे शहरातील नागरिकांत खळबळ माजली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.जत शहराचे उपनगर असलेल्या विठ्ठलनगर व वसंतनगर येथील नागरिकांना वळसंग रोड येथील केंचराया मंदिराजवळ असलेल्या पाच लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या टाकीतून दोन किवा तीन दिवसांतून एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. वसंतनगर येथील देवकर बोळात गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाला होता. आज (रविवार) सकाळी येथील पाईपलाईन खोदून पाहिली असता, त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मृत झालेली घोरपड अडकून बसल्याचे व त्यामुळे पाणी पुरवठा बंद होता, असे नगरसेवक परशुराम मोरे व पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.केंचराया येथील पाण्याच्या टाकीवर झाकण बसविण्यात आलेले नाही. याशिवाय टाकीच्या सभोवताली संरक्षक भिंत अथवा कुंपण घातलेले नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री येथे मद्यपी लोकांचा सतत वावर असतो. यापूर्वी पाईपलाईनमधून भाजीव विटा, मोठे चेंडू, दारुच्या बाटल्या, जळालेली सिगारेट, निरोधची पाकिटे येऊन पाईपलाईन बंद झाली होती. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परंतु त्याची दखल घेतली जात नाही. जोपर्यंत येथील अपूर्ण काम पूर्ण केले जात नाही, तोपर्यंत येथे सुरक्षा रक्षक नियुक्त करावा आणि नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका टाळावा, अशी मागणी नगरसेवक परशुराम मोरे यांनी केली आहे. (वार्ताहर)कर्मचाऱ्यांची अपुरी संख्यायासंदर्भात जत नगरपालिका नगराध्यक्ष रवींद्र साळे व मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पालिकेत कर्मचारी संख्या अपुरी आहे. त्यामुळे तेथे सुरक्षा रक्षक नियुक्त केला नाही. परंतु टाकीचे अपूर्ण काम पूर्ण करून सभोवताली संरक्षक भिंत त्वरित बांधली जाईल, असे त्यांनी सांगितले.