शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांसाठी धावली पतंगरावांची कन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:08 IST

भिलवडी : पलूस तालुक्यात आलेल्या महापुरानंतर नदीकाठची गावे हळूहळू सावरू लागली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता डॉ. पतंगराव कदम यांची ...

भिलवडी : पलूस तालुक्यात आलेल्या महापुरानंतर नदीकाठची गावे हळूहळू सावरू लागली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता डॉ. पतंगराव कदम यांची कन्या डॉ. अस्मिता जगताप व त्यांचे पती राजेंद्र जगताप व दीर पुणे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप हेही धावून आले आहेत. त्यांनी सोपानकाका सहकारी बँक लि., सासवड व अन्य संस्थांच्यावतीने संतगाव हे गाव दत्तक घेतले. डॉ. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारती हॉस्पिटलची २० पथके पूरग्रस्त भागात वैद्यकीय सेवा देत आहेत.जगताप यांच्या विविध संस्थांमार्फत संतगाव येथील पडझड झालेल्या घरांची पुनर्बांधणी, गावातील रस्त्यांची दुरूस्ती, शौचालयांची व्यवस्था, शाळांची उभारणी, जनावरांचे गोठे, रुग्णालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात संत सोपानकाका बँक, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, पुरंदर मिल्क, पुरंदर अ‍ॅग्रो प्रा. कंपनी असे इतर, यांच्यासह अनेक सहकारी संस्थांचे सभासद, सहकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर केला आहे. पतंगराव कदम यांनी मोठ्या कष्टाने हा परिसर जपला. आज त्यांची मुले व स्नुषाही त्याच तडफेने या परिसराच्या कठीण प्रसंगात धावून आले आहेत.पुराच्या पहिल्या दिवसापासून आ. डॉ. विश्वजित कदम यांनी मदतकार्यात सहभागी होऊन पूरग्रस्तांना आधार दिला. आता पूर ओसल्यानंतर डॉ. अस्मिता जगताप यांनी स्वत: ठिकठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवत लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली. डॉ. अस्मिता यांनी सासरच्या संस्थांमार्फत याठिकाणी पुनर्वसनाची जबाबदारी देखील स्वीकारली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माहेरवाशीण धावून आल्याची भावना व्यक्त होत आहे.