गणेश खिंड (भवानीनगर, ता. वाळवा) व चिंचणी (वाजेगाव, ता. कडेगाव) या परिसरात दोन रानगव्यांचे वारंवार दर्शन होत आहे. वाजेगाव येथील तरुणांनी काढलेली या गव्याची छायाचित्रे व व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून
आसद, चिंचणी, वाजेगाव व भवानीनगर
परिसरात दोन गवे आढळून येत आहेत. गुरुवारी आसद शिवारातून वाजेगावच्या दिशेने जाताना काही
शेतकऱ्यांनी दोन गवे पाहिले. या शेतकऱ्यांनी वाजेगाव येथील तरुणांना
याबाबतची माहिती दिली. यावर येथील तरुणांनी पडताळणी केली
असता दोन्ही गवे गणेशखिंडीच्या डोंगरकपारीतून भवानीनगरकडे जाताना
दिसले. या तरुणांनी या गव्यांची छायाचित्रे घेतली व व्हिडिओ करून समाजमाध्यमातून व्हायरल केला.
मागील काही महिन्यांपूर्वी सागरेश्वर अभयारण्य परिसरात आढळलेले हेच दोन
गवे असावेत, अशी चर्चा आहे.