शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यांची चांदोलीबाहेर भटकंती धोक्याची : तीन तालुक्यांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 00:08 IST

जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात.

ठळक मुद्देमृत्यूचे प्रमाण वाढले ; वन विभागाने लक्ष देण्याची गरज

गंगाराम पाटील ।वारणावती : चांदोली अभयारण्य व जंगलातील भुकेले बिबटे खाद्यासाठी प्रकल्प क्षेत्राबाहेर फिरू लागले आहेत. अभयारण्याशेजारील शिराळा, पाटण व वाळवा तालुक्यामध्ये वारंवार त्यांचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे बिबट्यांच्या भटकंतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही भटकंती बिबट्यांच्या जिवावर बेतू लागली आहे. गेल्या दहा वर्षात अभयारण्याबाहेर सात, तर अभयारण्यात दोन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वन विभागाने बिबट्यांच्या रक्षणासाठी योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात.

आपल्या घराजवळ राहून आपल्या पिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. अशातच अभयारण्याबाहेर पडलेले बिबटे पुन्हा अभयारण्यात फिरकलेच नाहीत. मादी बिबट्याने उसाच्या शेतात पिलांना जन्म दिला की, त्यांचा वावर तेथील परिसरातच असतो. त्यांना तोच आपला अधिवास आहे असे वाटते.

बिबट्यांच्या भटकंतीबरोबर त्यांच्या अपघाती तसेच नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. काही चोरट्य शिकारीमुळे, काही विषबाधा झाल्याने, तर काही अपघात झाल्याने बिबट्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आता वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन बिबट्यांविषयी गावा-गावात जनजागृती करणे, त्यांच्याविषयीची भीती दूर करणे, बिबट्यांच्या सवयी, आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करुन बिबट्या व मानव या दोघांचेही संरक्षण करण्याची गरज आहे.

  • उद्यानात सोय व्हावी

गाव परिसरामध्ये भटकी जनावरे असतात. बिबट्यांना ही भटकी जनावरे सहजासहजी भक्ष्य म्हणून उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक बिबटे मानवी वस्त्यांकडे येतात. त्यामुळे गाव स्वच्छ ठेवणे आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त, हाच बिबट्याला नागरी वस्तीत फिरकू न देण्याचा उपाय आहे. तसेच त्यासाठी वनाच्छादित क्षेत्र वाढविणे, खाद्यान्न उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे.

  • वन विभाग सुस्त

बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावण्यापलीकडे काहीच केले जात नाही. बिबट्या दिसल्यावर कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती दिली जात नाही. तसेच नागरिकांना मार्गदर्शनही केले जात नाही.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्या