शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा पालिकेच्या सभेत घंटागाडी खरेदीप्रश्नी वादंग : घरकुलांचे ७०२ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:30 IST

आष्टा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घंटागाड्या खरेदीच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. नोकरभरतीवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांना

आष्टा : आष्टा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घंटागाड्या खरेदीच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. नोकरभरतीवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांना नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी चांगलेच खडसावले.आष्टा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्षा रुक्मिणी औघडे उपस्थित होत्या.

बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत आष्टा पालिकेस थ्री स्टार रेटिंग देण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा, तसेच आष्टा शहर हागणदारीमुक्त झाले असून ओडीएफ प्लस रेटिंग देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १३९३ अर्ज आले असून, ७०२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासन निकषानुसार मंजुरीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी यावेळी दिली.

नगरसेवक अर्जुन माने म्हणाले, शहरातील मयूर माने यांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. पालिकेने त्यांच्या मुलांना दहा लाखाची मदत देऊन त्यांच्या शाळेचा खर्च करावा. बाजार कट्टा परिसरात अतिक्रमण करून राहिलेल्या पारधी लोकांना बाहेर काढावे, पालिका कर्मचाºयांकडून जन्म-मृत्यूच्या नोंदीसाठी अधिक रक्कम घेतली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, याबाबत संबंधितांना समज द्यावी, पालिकेच्या सर्व कर्मचाºयांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करावी.

बैठकीत विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांनी, सोमलिंग तलाव, नोकरभरती, घंटागाडी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डिजिटल फी आकारणीबाबत सत्ताधाºयांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी त्यांना, सभेत अभ्यास करून बोला, अशा शब्दात खडसावले. बैठकीत तेजश्री बोन्डे, वर्षा औघडे यांनीही नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. झुंझारराव पाटील, धैर्यशील शिंदे, सुनील माने, संगीता सूर्यवंशी, सारिका मदने, शेरनवाब देवळे, पी. एल. घस्ते, पुष्पलता माळी, मनीषा जाधव आदी यावेळी उपस्थित होतेमुख्याधिकारी सभेस अनुपस्थितआष्टा पालिकेच्या सभेत मुख्याधिकारी हेमंत निकम अनुपस्थित होते. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सल्लागार अभियंता चंद्रकांत पाटील यांनी दिली; तर आरोग्य अधिकारी आर. एन. कांबळे यांनी विषय वाचन केले. आष्टा पालिकेच्या सभेत विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांनी विषय वाचन सुरू असताना, घंटागाड्या कधी येणार, याबाबत विचारले असता, नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी, विषय झाल्यानंतर चर्चा करू, असे सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी, पालिकेला ९ घंटागाड्या मंजूर झाल्या असून, ६ गाड्यांचे टेंडर तांत्रिक चुकीमुळे पुढे गेले आहे असे सांगून, पुढील बैठकीत यावर निर्णय घेण्यास मान्यता दिली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली