सांगली : शहरातील कापड पेठ येथील रामचंद्र स्टीलची धोकादायक इमारत उतरवून घेण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतीवर कारवाईचा धडाका लावला आहे. कापड पेठेतील रामचंद्र स्टील ही इमारत धोकादायक बनली होती. महापालिकेने इमारत मालकांना नोटीसही बजाविली होती. सोमवारी आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अशोक कुंभार, शाखा अभियंता ऋतुराज यादव, स्वच्छता निरीक्षक प्रणील माने, धनंजय कांबळे यांच्यासह पथकाने पोलीस बंदोबस्तात कापड पेठेतील रामचंद्र स्टील ही धोकादायक इमारत उतरवून घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत शहरातील चार ते पाच धोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत, तर ७० हून अधिक मालमत्ताधारकांना नोटिसा बजाविल्या आहेत.
कापडपेठेतील धोकादायक इमारत पाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST