शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गव्हाणमध्ये माजी उपसरपंचाचा तलवार घेऊन डान्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:51 IST

तासगाव : गव्हाण (ता. तासगाव) येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमात डॉल्बीच्या तालावर ठेका धरून माजी उपसरपंच तुकाराम यादव याने तलावर घेऊन ...

तासगाव : गव्हाण (ता. तासगाव) येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमात डॉल्बीच्या तालावर ठेका धरून माजी उपसरपंच तुकाराम यादव याने तलावर घेऊन डान्स केला. हा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत तलवार जप्त करून यादववर गुन्हा दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी, गव्हाण येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शुक्रवारी रात्री डॉल्बीच्या दणदणाटात तुकाराम यादव याच्यासह कार्यकर्त्यांचा धांगडधिंगा सुरू होता. यावेळी यादव याने हातात तलवार घेऊन नाच केला. नाच करतानाचे शूटिंग घेऊन हा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरलदेखील करण्यात आला. शनिवारी हा व्हिडिओ तालुकाभर व्हायरल झाला. तलवार घेऊन केलेला नाच यादवला चांगलाच अंगलट आला. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तलवार जप्त केली असून तुकाराम यादववर आर्म अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके यांनी ही कारवाई केली.