मिरज : मिरजेत इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे शहरात सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शहरातील पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ व महागाई विरोधात नागरिकांच्या सह्या घेऊन स्वाक्षरी अभियानाची सुरुवात करण्यात आली.
इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. कोरोना साथीमुळे तीन महिन्यांपासून रोजगार बंद असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. इंधन दरवाढ व महागाई या विरोधात काँग्रेसच्या वतीने महाराणा प्रताप चौकातून गांधी चौकातील जोशी पेट्रोल पंपापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पेट्रोल पंपावर नागरिकांना गाजर भेट देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. स्वाक्षरी अभियानासही नागरिकांनी प्रतिसाद दिला. युवक काँग्रेसतर्फे राज्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून पन्नास हजार सह्यांचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शहराध्यक्ष संजय मेंढे, अय्याज नायकवडी, नगरसेवक करण जामदार, धनराज सातपुते, संभाजी पाटील, आयुब निशानदार, योगेश जाधव, बबलू मेंढे, विनायक मेंढे, अमोल पाटील, सुजित लकडे, यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.