शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
7
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
8
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
9
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
10
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
11
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
12
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
13
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
14
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
15
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
16
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
17
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
18
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
19
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
20
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 

ग्राहकांच्या तक्रारींनी ओलांडला पंधरा हजारी टप्पा

By admin | Updated: March 14, 2017 23:44 IST

राज्यातही डंका : प्रकरणांचा निपटारा करण्यातही मोठ्या शहरांच्या तुलनेत सांगली जिल्हा मंच आघाडीवर

अविनाश कोळी ल्ल सांगलीजिल्ह्यातील ग्राहकांमधील हक्काप्रती जागृतीचा आलेख वाढत असून, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या स्थापनेपासून दाखल झालेल्या तक्रारींची संख्या आता पंधरा हजारावर गेली आहे. यातील १४ हजारावर तक्रारींचा निपटारा करण्यातही येथील मंचला यश मिळाले आहे. तक्रारींच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या राज्यातील मोजक्याच जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश झाला आहे. ग्राहक संरक्षण कायदा देशात दिनांक २४ डिसेंबर १९८६ रोजी लागू करण्यात आला. राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हास्तरावर ४० जिल्हा ग्राहक मंच कार्यान्वित आहेत. सांगलीचा मंच १९९0 ला कार्यान्वित झाला. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या आकडेवारीनुसार जुलै २०१५ अखेर स्थापनेपासून दाखल झालेल्या एकूण तक्रारींमध्ये मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांनीच दहा हजारी टप्पा ओलांडला होता. सांगली आजही तक्रारींच्या संख्येत आणि निपटारा करण्याच्या गतीत राज्यात आघाडीवर दिसत आहे. १९९0 पासून फेब्रुवारी २0१७ अखेर जिल्ह्यातील तक्रारींनी पंधरा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सध्यस्थितीत केवळ १ हजार ९९ प्रकरणे प्रलंबित आहेत. निपटारा करण्याची टक्केवारी ९३ टक्के इतकी आहे. जानेवारी २0१६ ते डिसेंबर २0१६ या कालावधित जिल्हा मंचाकडे एकूण २७९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींच्या विवरणानुसार सध्या डॉक्टर, बिल्डर यांच्याबद्दलच्या तक्रारीही दाखल होत आहेत. सहकारी संस्था, पतसंस्था, बॅँकांबाबतच्या तक्रारींचे प्रमाण सांगली जिल्ह्यात सर्वाधिक आहे. यातील अनेक प्रकरणांचा निपटारा झाला आहे. इशाऱ्यानेही होतो फायदाअनेक ग्राहकांनी सेवेतील त्रुटीबद्दल, अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसल्याबद्दल ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतरही संबंधित सेवा देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी ग्राहकांना सहकार्य केल्याची उदाहरणेही समोर येत आहेत. त्यामुळे जागृतीचा हासुद्धा फायदा आता ग्राहकांच्या पदरात पडत आहे. राज्यातील स्थिती जिल्हा मंचकडे स्थापनेपासून जुलै २०१५ पर्यंत दाखल झालेल्या आकेवारीत आघाडीवर असलेले जिल्हे पुढीलप्रमाणेमंच दाखल प्रकरणे निपटारा प्रलंबितनागपूर१८,९२४१६,९२३२00१पुण१७,१२९१५,७१५१,४१४मुंबई १५,७८३१३,७२५२0५८उपनगर जिल्हाठाणे १४,५0१११,३९६३,१0५कोल्हापूर१४,३८३१३,६७0७१६जळगाव १३,५७११२,१0४१,४६७सांगली१२,२५२११,७१४५३८औरंगाबाद१२,२0७११,९0८२९९