शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

दर घसरल्याने बेदाणा उत्पादक हवालदिल

By admin | Updated: December 24, 2015 00:39 IST

नवीन हंगाम तोंडावर : सध्याचा ८० ते १३५ रुपये दर न परवडणारा

गजानन पाटील- संख -बाजारात आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने बेदाण्याचा दर कमालीचा घसरला आहे. कोल्ड स्टोअरेजचे भाडे, प्रक्रिया करण्याचा खर्च वजा जाता, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे जत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थिती, त्यात द्राक्ष हंगामाचा खर्च यामुळे मार्च महिन्यात कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेला बेदाणा विकण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याने, द्राक्ष उत्पादक व बेदाणा शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या ८० ते १३५ रुपये प्रति किलो भाव आहे. जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बेजार झालेला द्राक्ष उत्पादक शेतकरी कमी भाव असूनही बेदाणा उत्पादक शेतकऱ्यावर कमी भावाने बेदाणा विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दुष्काळाने बेजार झाला असल्याने चिंताग्रस्त बनला आहे. तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक सिंचनचा वापर करीत बागा उभा केल्या आहेत. मडकी सिंचनाच्या साहाय्याने बागा लावल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या अनुदानावर व स्थत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करुन दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. शरद सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी जातीच्या बागा आहेत. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.गेल्यावर्षी पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती असतानासुध्दा शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा तसेच टँकरद्वारे बागा जगविल्या आहेत. काही बागांना खोड जगविण्याएवढेही पाणी मिळाले नाही. परंतु शेतकऱ्यांनी बागा महत्प्रयासाने जगवून फळ आणले आहे. पण प्रतिकूलहवामानामुळे प्रारंभापासूनच दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. औषधांवर मोठा खर्च झाला होता. पाण्याच्या कमतरतेमुळे काड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. पाण्याअभावी खतांची मात्रा कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड आणि मणी लहान तयार झाले. अवकाळी पावसामुळे काढणीसाठी परिपक्व झालेल्या द्राक्षात आलेली साखर कमी झाली. बेदाणा चपटा झाला होता. बेदाण्याचा उतारा कमी झाला होता. बेदाण्याचा उतारा कमी झाला होता.असे असतानाही द्राक्ष बागायतदारांनी बाजारात विक्रीसाठी न आणता पुढे जास्त भाव मिळेल, या उद्देशाने कोल्ड स्टोअरेजमध्ये माल वॉशिंग, त्याची प्रतवारी करून ठेवला. यावर हजारो रुपये खर्च केला होता.मार्च-एप्रिल महिन्यामध्ये चांगला दर्जेदार बेदाणा २२५ ते २५५ रुपये, तर दोन नंबर बेदाण्यास १६० ते २२५ रुपये भाव होता. परंतु २०१४ मध्ये बेदाण्याला उच्चांकी भाव मिळाला होता. त्यावेळी २७५ ते ३५० रुपये इतका भाव मिळाला होता. त्यामुळे याहीवर्षी भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोअरेजमध्ये माल ठेवला आहे. सुरुवातीला चांगला भाव होता; पण सध्या मोठी घसरण झाली आहे. कोल्ड स्टोअरेजचा दहा महिन्यांचा खर्च, वॉशिंग, प्रतवारीचा खर्च, बेदाणा निर्मितीचा खर्च, औषधे, खते, मशागतीचा खर्च वजा जाता, सध्याचा दर अजिबात परवडत नाही. परंतु द्राक्ष हंगामाचा खर्च करण्यासाठी बेदाणा विकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. - कामाण्णा पाटील, बेदाणा उत्पादक शेतकरी