शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

बेदाणा उत्पादन कमालीचे घटले

By admin | Updated: April 16, 2016 00:20 IST

उतारा कमी : जत तालुक्यात परिस्थिती गंभीर

गजानन पाटील -- संख -दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, तसेच खत व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत तालुक्यातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बेदाण्याला बाजारात चांगला दर असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. अवकाळी पावसामुळे काही भागातील द्राक्षातील साखर कमी झाल्यामुळे बेदाण्याचा प्रतिएकरी उताराही कमी झाला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.पाणीटंचाई असूनही जत पूर्व भागात द्राक्षबागांची संख्या अधिक आहे. गतवर्षी १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा, शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा तसेच टँकरद्वारे पाणी आणून बागा जगविल्या आहेत. तसेच काही बागांना खोड जगविण्यासाठीही पाणी मिळाले नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना थोडे फार पाणी उपलब्ध होते, त्यांनी बागा महत्प्रयासाने जगविल्या. शेतकऱ्यांना उमदी परिसरामध्ये टँकरने पाणी पुरवठा करुन बागा आणल्या आहेत. टँकरसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. प्रतिकूल हवामानामुळे प्रारंभापासूनच दावण्या, भुरी, रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पाण्याच्या कमतरतेमुळे काड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खरड छाटण्या उशिरा झाल्या होत्या. पाण्याअभावी खताची मात्रा कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगविण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड, मणी लहान तयार झाले.आलेली साखरही अवकाळी पावसामुळे कमी झाली. बेदाणा चपटा झाला. चार ते साडेचार किलो द्राक्षातून एक किलो बेदाणा तयार झाला आहे. बेदाण्याचा उतारा कमी झाला. वातावरणातील बदलामुळे बेदाणा दर्जेदार झाला नाही. काळपट बेदाणा तयार झाला. वजनातही कमालीची घट झाली. बेदाण्याचा उतारा एकरी दोन टनाऐवजी दीड लाखापेक्षाही कमी झाला आहे.द्राक्षाला बाजारात म्हणावा तसा भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला आहे. अनुकूल हवामान, खडकाळ जमीन यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:ची बेदाणा शेड उभी केली आहेत. सध्या बाजारात बेदाण्याला १३० ते १९० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. परंतु कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही. यावर्षी द्राक्षांवर बागायतदारांनी मोठा खर्च केला आहे. बँक, सोसायटी, सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आहे.अवकाळीने नुकसान : मदतीची मागणीबेदाण्यासाठी द्राक्षाचा कालावधी १२० दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे. मण्यामध्ये साखरेचे प्रमाण २४ ते २८ इतके असावे लागते. दिवस पूर्ण झाले तरच साखरेचे प्रमाण वाढते. वाढते तापमान, कमी झालेला पाऊस यामुळे कूपनलिका, विहिरीतील पाणी कमी झाले. कमी पाण्यामुळे द्राक्षे लवकर बेदाण्यासाठी शेडवर टाकावी लागली. याचाही परिणाम बेदाणा उत्पादनावर झाला आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे. मणी, घड गळून पडले आहेत. साखरेचे प्रमाण कमी झाल्याने बेदाणा चपटा झाला. शासनाने द्राक्षबागेवरील कर्जे, वीज बिल माफ करावे, अशी आमची मागणी आहे, असे द्राक्षबागायतदार विलास कुंडलिक शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.