ते म्हणाले की, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, पलुस यासह अन्य तालुक्यांमध्ये बेदाणा तयार केला जात आहे. त्यातच निर्यात बंद असल्याने द्राक्षाचे दर कोसळले आहेत. मोठ्या प्रमाणात बेदाणा उत्पादन झाले आहे. महिनाभरापासून नवीन बेदाण्याची आवक सुरू आहे. बाजार समितीत बुधवारी आणि शुक्रवारी सौदे काढले जातात. किमान शंभर गाड्या म्हणजे एक हजार टन आवक सुरू झाली होती. आवकेमध्ये वाढ होत असल्याने रविवारीही बेदाणा सौदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्षाला दर नसल्याने मोठ्या प्रमाणात बेदाणा तयार करण्यात आला आहे. आवक जास्त असल्याने, तसेच मालाचा उठाव होण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस सौदे काढण्याचा निर्णय घेतला आहे. आता रविवारीही सौदे काढण्यात येणार आहेत. यापुढे किमान दीड ते दोन महिने रविवारीही सौदे निघणार आहेत.
सांगली मार्केट यार्डात आज बेदाणा सौदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST