शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील बेदाणा सौदे आता 'या' ठिकाणी होणार; काही व्यापाऱ्यांचा विरोध

By अशोक डोंबाळे | Updated: October 28, 2023 18:40 IST

सावळी येथील साडेतेरा एकर जमीन खरेदीसाठी सुमारे १३ कोटी रुपये व ती जागा विकसित करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च बाजार समिती प्रशासनाने केला

सांगली : येथील मार्केट यार्डातील बेदाणा सौदे सावळी (ता. मिरज) येथे हलविण्यात येणार आहेत. सौद्याचा हॉल असोसिएशन बांधणार असून महिनाभरात सर्व काम करून सावळीला सौदे घेऊन जाण्याचे बेदाणा असोसिएशन आणि सांगलीबाजार समितीचे नियोजन आहे. त्यादृष्टीने बेदाणा व्यापारी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली आहे; पण दुसऱ्या गटाची नाराजी असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने सोमवारी पुन्हा बैठक बोलाविली आहे.सावळी येथील साडेतेरा एकर जमीन खरेदीसाठी सुमारे १३ कोटी रुपये व ती जागा विकसित करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च बाजार समिती प्रशासनाने केला आहे. या वादग्रस्त जागेबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी बाजार समितीसाठी योग्य नाही. उच्चदाब वीज वाहिनी असल्यामुळे जागा विकसित करण्यासाठी अडचणी येणार आहेत, असा ठपकाही चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. या परिस्थितीमध्येही सांगलीचे बेदाणा सौदे सावळीला कशासाठी आणि कुणाच्या स्वार्थासाठी हलविले जात आहे, असा आरोप काही बेदाणा व्यापाऱ्यांनी केला आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगलीचे बेदाणा सौदे सावळीला हलविण्याची गरज नाही. सांगलीतील बेदाणा सौद्याची जागा शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी सोयीची आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये बेदाणा सौदे सावळीला हलवू नये, अशी भूमिका बहुतांशी बेदाणा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे. दुसऱ्या बाजूला काही मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी सांगलीचे बेदाणा सौदे सावळीला घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे तर बेदाणा सौद्यासाठी शेडसह तेथील मूलभूत सुविधा असोसिएशनतर्फे करण्याचीही त्यांनी तयारी ठेवली आहे. या खर्चालाही बेदाणा असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे.

व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी सावळीला सौदे : सुजय शिंदेसांगली मार्केट यार्डातील बेदाणा सौद्याची जागा अपूर्ण आहे. म्हणून बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खर्च करून सावळीला सौदे घेऊन जाण्याची तयारी ठेवली आहे. काही व्यापाऱ्यांचा विरोध आहे. या व्यापाऱ्यांची सोमवारी बैठक घेऊन त्यांचीही भूमिका जाणून घेतली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार