शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या निर्णयामुळे गर्दीस निमंत्रण : समीर शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:00 IST

CoronaVirus Sangli : महापालिका व पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या लॉकडाऊनच्या घोषणा करुन संभ्रम वाढविला. कडक अंमलबजावणी करायची नव्हती तर मग चुकीच्या निर्णयातून गर्दीला निमंत्रण का दिले, असा सवाल व्यापारी एकता असोसिशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देचुकीच्या निर्णयामुळे गर्दीस निमंत्रण : समीर शहानियाजनशून्य उपक्रमात यापुढे सहभाग नाही

सांगली : महापालिका व पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या लॉकडाऊनच्या घोषणा करुन संभ्रम वाढविला. कडक अंमलबजावणी करायची नव्हती तर मग चुकीच्या निर्णयातून गर्दीला निमंत्रण का दिले, असा सवाल व्यापारी एकता असोसिशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी उपस्थित केला.यासंदर्भात त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ३ मे रोजी महापौरांनी असोसिएशनला बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्या बैठकीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असणाऱ्या असोसिएशनचे नेतेही हजर होते. महापौरांनी कडक लॉकडाऊनसाठी विनंती केली. त्याला असोसिएशनने सकारात्मकता दर्शविली. तेव्हा ५ ते ११ मे या आठ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय झाला होता.त्यानंतर लगेचच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सांगली जिल्हयात ६ मे पासून कडक लॉकडाऊनची घोषणा केली. दोन्हीही घोषणेत फक्त एक दिवस आणि ४ तासाचा अत्यावश्यक व्यवसायाचा फरक आहे. आम्ही प्रशासनास ही बाब विचारली आणि नेमक्या तारखेबाबत विचारणा केली. या गोंधळामुळे गर्दी झाली.त्यामुळे यापुढे अशा नियोजनशून्य उपक्रमात संघटना इथून पुढे सहभागी होणार नाही. गेले वर्षभर अखंड लॉकडाऊनमध्ये सुरूच असलेल्या दुकानांनी फक्त सकाळचे चार तासही दुकाने बंद ठेवली नाहीत. सोमवारी शहरात झालेली गर्दी ही कपडे, भांडी, सोने खरेदी करण्यासाठी नव्हती, तर ती अत्यावश्यक सेवेतील दुकानांमध्येच होती. याचे आत्मचिंतन व्हावे. कुठतरी एकवाक्यता ठेवण्यात प्रशासनाची चूक होत आहे. इथून पुढे आरोग्य आणि व्यवसाय दोन्हीची सांगड घालूच, पण इतर व्यापारी बांधवांवर होणारा अनावश्यक अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली