शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-गर्दी जमविणाऱ्या कार्यक्रमांवर 31 मार्च पर्यंत बंदी : डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 13:26 IST

करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्‍मक उपयोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे टाळणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

ठळक मुद्देगर्दी जमविणाऱ्या कार्यक्रमांवर 31 मार्च पर्यंत बंदी : डॉ. अभिजीत चौधरीकौटुंबिक कार्यक्रमांमध्येही वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक

सांगली : करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्‍मक उपयोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे टाळणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये मोठ्याप्रमाणात लोकांना समुह जमू न देण्यासाठी संपुर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सभा, मेळावे, सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, धार्मिक, जत्रा, यात्रा, ऊरुस व क्रिडाविषयक इत्यादी कार्यक्रम घेण्यास दिनांक 15 ते 31 मार्च पर्यंत बंदी लागू केली आहे.धार्मिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु यांना विधिवत पुजा करण्यास तसेच खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास या आदेशाद्वारे बंदी असणार नाही परंतु या दोन्हीबाबत वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.या संदर्भात सर्व शासकीय यंत्रणांनी सभा, मेळावे, सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, धार्मिक, जत्रा, यात्रा, ऊरुस व क्रिडाविषयक इत्यादी कार्यक्रम आयोजनासंदर्भात कोणतही परवानगी देऊ नये तसेच यापुर्वी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या रद्द कराव्यात, असे निर्देशित केले आहे.अशा गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास संबधित संयोजकांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध असे मानन्यात येईल व कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.अंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत करोना विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. तसेच अंतरराष्ट्रीयस्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहे. असे प्रवाशी सांगली जिल्ह्यामध्येही परदेश प्रवास करुन आलेले आहेत व बरेच प्रवासी परतन्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्‍मक उपयोजना आखणे आवश्यक असून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाSangliसांगली