शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

विष्णू माने यांना फौजदारीची नोटीस : सांगली आयुक्तांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:34 IST

सांगली : महापालिकेच्या महासभेत खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांना फौजदारी कारवाईची नोटीस

ठळक मुद्देअब्रुनुकसानीचाही दावा करणार; खोटे आरोप करून बदनामीपण आतापर्यंतच्या आयुक्तांनी कधी कारवाईचा बडगा उगारला नव्हता. खेबूडकर यांनी मात्र नगरसेवकाला नोटीस बजावून नव्या वादाला तोंड फोडले

सांगली : महापालिकेच्या महासभेत खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांना फौजदारी कारवाईची नोटीस दिली आहे. आयुक्तांच्यावतीने अ‍ॅड. किरण नवले यांनी ही नोटीस बजावली आहे.

महापालिकेच्या ५ डिसेंबरच्या सभेत आयुक्तांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हंगामा केला होता. आयुक्त खेबूडकर यांच्या भूमिकेमुळे रखडलेली विकास कामे, प्रलंबित फायली यामुळे शहराचा विकास थांबला असल्याची तक्रार सदस्यांनी केली होती. या सभेत विष्णू माने यांनी आयुक्तांवर टीकाही केली होती. महासभेत झालेल्या चर्चेवरुन आयुक्तांनी संबंधित नगरसेवकांवर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. यानुसार माने यांना आयुक्तांनी फौजदारीची नोटीस बजाविली आहे.

नोटिसीत म्हटले आहे की, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व कायद्याने काम करणारे अधिकारी म्हणून आयुक्तांनी दबदबा निर्माण केला आहे. त्यांनी आतापर्यंत कधीही आणि कुठेही बेकायदेशीर काम केलेले नाही. असे असताना बदनामी केली आहे. ‘खेबूडकर यांच्या कार्यकाळात सर्वाधिक बेकायदा कामे झाली असून यातील त्यांचा इंटरेस्ट उघड झाला आहे. दोन लाखाच्या कामात सतरा त्रुटी काढणारे आयुक्त ड्रेनेज ठेकेदाराला गुपचुप बिल देतात. तीन-तीन आलिशान गाड्या रातोरात ऐनवेळचा ठराव करुन खरेदी करतात. स्वत:च्या इंटरेस्टच्या फायलीत त्यांची गतिमानता असते. सुटीच्या दिवशीही वर्कआॅर्डर दिल्या जातात’, अशा पध्दतीने बेछूट आरोप केले आहेत. त्यामुळे जनमानसात बदनामी झाली आहे.

आमच्या अशिलाची बदनामी, मानहानी त्यांच्या इभ्रतीस जाणूनबुजून धक्का द्यावा, हा एकच दुष्ट व आंतरिक हेतू ठेवून आपण खोटे आरोप केले आहेत. या खोट्या आरोपांमुळे बदनामी झाली आहे. विकासाच्या योजना, शासकीय योजना नियमाप्रमाणे पूर्ण करण्यावर आयुक्तांनी भर दिल्याने काहींचे हितसंबंध दुखावले आहेत. यामुळेच असे खोटे, चुकीचे ,बेछूट आरोप केले आहेत. आपल्या वागणुकीने फौजदारी स्वरुपाचा गुन्हा केला आहे. त्यामुळे आपण शिक्षेस पात्र आहात. त्यामुळे आपणाविरुध्द फौजदारी फिर्याद दाखल करीत आहे. आरोपामुळे नाहक बदनामी झाल्याने नुकसान भरपाईचा दावाही दिवाणी न्यायालयात दाखल करीत आहे. शिवाय या बेकायदेशीर कृतीबाबत आपल्याविरुध्द राज्य सरकारकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही नोटिसीत म्हटले आहे.महापालिकेत कारवाईवरून नव्या वादाला तोंडमहापालिकेतील नगरसेवक विष्णु माने यांना आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी फौजदारी कारवाईची नोटीस बजाविली आहे. या नोटीसेबद्दल महापालिकेतील बहुतांशी नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही प्रशासन विरूद्ध नगरसेवक असा अनेकदा संघर्ष झाला आहे. अगदी डोळे काढण्याची भाषाही सभागृहात वापरली गेली आहे. बुटाने मारण्यापर्यंत कधीकधी जीभ घसरली आहे. पण आतापर्यंतच्या आयुक्तांनी कधी कारवाईचा बडगा उगारला नव्हता. खेबूडकर यांनी मात्र नगरसेवकाला नोटीस बजावून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यात सोमवारी १८ रोजी महासभा होत आहे. या सभेत नोटिसीवरून वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत.