शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मुलांना अन्नातून विषबाधाप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी

By शीतल पाटील | Updated: July 17, 2023 21:49 IST

वान्लेसवाडी शाळेतील प्रकार, महापालिकेकडून पोलिसात फिर्याद.

शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : महापालिकेच्या वान्लेसवाडी येथील शाळेत मुलांना निकृष्ट पोषण आहार दिल्याप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ जानेवारी रोजी घडली. होती. पोषण आहारामुळे ३६ मुलांना विषबाधा झाली होती. याप्रकरणी शिक्षण मंडळाचे लेखापाल गजानन बुचडे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. बचत गटातील सात महिलांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

बचत गटाच्या अध्यक्ष वंदना धनंजय रुपनर, सचिव सरस्वती भगवान रुपनर, शालन आकाराम रुपनर, पार्वती लक्ष्मण कोळपे, मुक्ता महादेव रुपनर, सुरेखा संजय कोळपे, पुुजा सचिन रुपनर या सदस्याविरोधात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वान्लेसवाडी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज या शाळेत पोषण आहार व मध्यान्ह भोजन पुरविण्याचा ठेका हौसाबाई रुपनर महिला बचत गटाला देण्यात आला होता. २७ जानेवारी रोजी बचत गटाकडून मुलांना भोजन देण्यात आले. भोजनानंतर पाचवी ते सातवीच्या २७९ विद्यार्थ्यांपैकी ३६ मुलांना मळमळ, पोटदुखी, उलटी होऊ लागली. मुख्याध्यापकांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्राकडील डाॅक्टरांना बोलावून तपासणी केली.

या मुलांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. बचत गटाकडून देण्यात आलेले अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. दरम्यान उपायुक्त स्मृती पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी एस. व्ही. हिरमेठ यांनी बचत गटाच्या स्वयंपाकगृहाची तपासणी करून अहवाल आयुक्त सुनील पवार यांना सादर केला होता. या चौकशी अहवालात मुलांना खराब अन्न पुरविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आयुक्तांनी महिला बचत गटाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण मंडळाला दिले होते. त्यानुसार लेखापाल बुचडे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली.स्वयंपाकगृहात अस्वच्छता, जळमटे

या महिला बचत गटाच्या स्वयंपाकगृहाची अन्न सुरक्षा अधिकारी हिरेमठ यांनी तपासणी केली. या तपासणीत स्वयंपाकगृह अस्वच्छ आढळून आले. अडगळीत साहित्य, खराब वस्तू, लाकडाचे तुकडे पडलेले होते. अन्नधान्य साठवणूकीची जागाही अस्वच्छ होती. जळमटे, किटकांचा वापर होता. भाताला वासही येत असल्याचे आढळून आले होते. तसा अहवाल हिरेमठ यांनी आयुक्तांकडे सादर केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी