सांगली : शिरोळ (जि. कोल्हापूर) येथे लग्नात मानपान केले नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी सांगलीची रहिवासी असलेल्या पीडितेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पती आदित्य दिलीप कोळी, सासरा दिलीप कृष्णा कोळी, सासू मीनाक्षी दिलीप कोळी, नणंद दीपाली दिलीप कोळी (सर्व रा. गणेशनगर, शिरोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता ही शहरातील गलीतल्या नेमिनाथनगर येथील रहिवासी आहे. तिचा गणेशनगर येथील आदित्यशी झाला होता. १५ मार्च २०२० ते १९ जुलै २०२० या कालावधीत सासरच्या लोकांनी लग्नामध्ये आम्हाला कमी सोने व कमी भेटवस्तू दिल्या आहेत. माहेरकडून मोठे मंगळसूत्र करून घेऊन घे या मागणीसाठी वारंवार त्रास दिला. तसेच लग्नात घातलेले ११ तोळे सोने काढून घेत तिला नांदविण्यास नकार दिला. त्यानंतर सांगलीत आलेल्या पीडितेने सासरच्या व्यक्तींविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.