शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यापेक्षा गाईचे दूध स्वस्त वाळवा तालुक्यात जादा दर : वेगवेगळ्या भागात दर अस्थिर;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:22 IST

गेल्या नऊ महिन्यांत म्हणजेच सप्टेंबरपासून सांगली जिल्ह्यात गाईच्या दुधाचे दर पडल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देउत्पादकांची आर्थिक कोंडी

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : गेल्या नऊ महिन्यांत म्हणजेच सप्टेंबरपासून सांगली जिल्ह्यात गाईच्या दुधाचे दर पडल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. पाण्यापेक्षा गाईच्या दुधाचे भाव कमी केल्यामुळे व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यातच जिल्ह्यातील दूध संघांनी दूध उत्पादकांना धक्का देत दर कमी करण्याची मालिकाच चालू केली आहे.जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात गाईच्या दुधाचे दर कमी-जास्त प्रमाणात उत्पादकांना मिळत आहेत. उन्हाळा वाढल्यावर तरी दुधाचे दर वाढतील, अशी आशा दूध उत्पादकांची होती; मात्र प्रंचड प्रमाणात उष्णता वाढूनही दूध दरात कोणतीही भाववाढ न झाल्याने नाराजी होती. त्यातच उष्णता वाढल्यामुळे दूध उत्पादन घटू लागले आहे.राज्य शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर ३.५ फॅटसाठी २७ रुपयांचा खरेदी दर जुलै २०१७ पासून लागू केला; पण त्याची कार्यवाही न होता तेव्हापासून दरात मोठी घसरण चालू होती. या दराच्या घसरणीने आता नीचांक गाठला आहे. दुधाची वाढलेली आवक आणि कमी मागणी, त्यात दूध पावडरीचे पडलेले दर याचे कारण पुढे करीत दर कपात केल्याचे जाहीर केले आहे. खासगी व सहकारी दूध संघांच्या संघटनांनी अनेक मुद्दे पुढे करून दूध दरवाढ कमी केली आहे; पण उन्हाळा वाढत चालला तरी दरवाढ करण्यासाठी शासन व संघस्तरावर कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत.दूध उत्पादकांची चिंता वाढलीआर्थिक कोंडीत सापडलेल्या दूध उत्पादकांना यातून बाहेर काढण्यासाठी शासन व संघांनी दरवाढ करावी, अशी मागणी होत असताना, पुन्हा दर कमी केल्याने दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे. दररोज कोट्यवधी रुपयांच्या दूध व्यवसायावर मंदीचे ढग निर्माण झाले असताना, कोणताही राजकीय नेता दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येताना दिसत नाही.कोल्हापूर जिल्ह्यात गाईच्या दुधाचे सध्याचे दर प्रतिलिटर २५ रुपयांच्या घरात असताना, सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील दर प्रतिलिटर १७ ते २३ रुपयांच्या घरात आहेत.वाळवा तालुक्यात सर्वात जास्त म्हणजेच ३.५ फॅटला २३ रुपये दर मिळत आहे. बाकीच्या तालुक्यात कमी दराने दूध खरेदी केली जात आहे.कोल्हापूरपेक्षा सांगलीत : दर कमी

टॅग्स :milkदूधMONEYपैसा