शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

थाटामाटात घातलं गाईचं डोहाळ जेवण, सांगलीतील कडेपुरात चर्चेचा विषय

By उद्धव गोडसे | Updated: February 15, 2023 18:09 IST

कडेगाव : हौसेला मोल नाही म्हणतात... या विधानाचा प्रत्यय कडेपूर (ता. कडेगाव) येथे आला. येथील शेतकरी किरण लालासो यादव ...

कडेगाव : हौसेला मोल नाही म्हणतात... या विधानाचा प्रत्यय कडेपूर (ता. कडेगाव) येथे आला. येथील शेतकरी किरण लालासो यादव यांनी मोठ्या उत्साहात त्यांच्या आनंदी गाईचे डोहाळ जेवण घातले. या उपक्रमाने कृषी संस्कृतीमधील देशी गायीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न. अनोख्या डोहाळ जेवणासाठी संपूर्ण गावासह पै-पाहुण्यांनी हजेरी लावली. थाटामाटात झालेले गाईचे डोहाळ जेवण कडेपूर पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले.खिलार प्रजातीच्या गायींची संख्या पुन्हा वाढावी यासाठी अनेक शेतकरी आणि गोप्रेमी प्रयत्न करीत आहेत. कडेपूर येथील किरण यादव यांच्या घरात पूर्वापार देशी गाईंचे पालन केले जाते. त्यांनी गेल्या वर्षी एक नवीन गाय खरेदी केली. आनंदाने तिचे नाव आनंदी असे ठेवले. शेतकऱ्याच्या दारातील समृद्धीचे प्रतीक असलेल्या गाईचे डोहाळ जेवण मोठ्या थाटामाटात करण्याचा निर्णय यादव कुटुंबीयांनी घेतला.

त्यानुसार मंगळवारी डोहाळ जेवणाचे आयोजन केले होते. डोहाळ जेवणासाठी गाईला सजवले होते. अंगावर झूल, रंगविलेली शिंगे, शिंगांना बांधलेले गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातलेली गाय सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. गाईसाठी स्वतंत्र मंडप घातला होता, तसेच तिच्या डोहाळ जेवणाचे फलकही गावात झळकले.गायीसमोर हिरव्या-सुक्या चाऱ्यासह अनेक पदार्थांची रेलचेल होती. महिलांनी गाईला पंचारतीने ओवाळून पूजन केले. अनेकांनी तिला गोग्रास भरवला, तर तिचे ओटीपूजन करून फोटोसेशनही झाले. कृषी संस्कृती आणि देशी गायी बद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला कडेपूरसह परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली. तसेच एक हजाराहून जास्त लोकांच्या पंगती उठल्या. कृषी संस्कृतीतील देशी गाईचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी रात्री कीर्तनाचेही आयोजन केले होते. हे अनोखे डोहाळ जेवण कडेपूर पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले.

टॅग्स :Sangliसांगली