शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद फोरममार्फत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 14:58 IST

corona virus Rss Sangli : कोरोनाकाळात रुग्णांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान आणि सांगली कोविड केअर रिसोर्सेस फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत १०० बेडच्या स्वामी विवेकानंद कोविड केअर सेंटर उभारण्यात आले.

ठळक मुद्देसांगलीत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरुराष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद फोरममार्फत पुढाकार

सांगली : कोरोनाकाळात रुग्णांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान आणि सांगली कोविड केअर रिसोर्सेस फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत १०० बेडच्या स्वामी विवेकानंद कोविड केअर सेंटर उभारण्यात आले.आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले. सांगली-मिरज रोडवरील श्री राधास्वामी सत्संग व्यासच्या जागेत सेंटर सुरु झाले आहे. येथे शंभर बेडची सोय करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी सामाजिक भान म्हणून संघाने हे कोविड सेंटर सुरु केले आहे.

ज्यांची अँटीजन टेस्ट, आरटीपीसीर टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे व कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत, अशा रुग्णांसाठी हे कोविड सेंटर आहे. या रुगणांना दाखल करुन घेताना दोन किट देण्यात येणार आहेत. एक औषधाचे किट आणि दुसरे चादर, टूथपेस्ट, ब्रश,पाण्याची बॉटल यासह आवश्यक साहित्याचे किट देण्यात येणार आहे.या ठिकाणी सात डॉक्टरांची एक स्वतंत्र टीम काम करीत आहे. दोनवेळा रुग्णांना आयुर्वेदीक काढा देण्यात येणार आहे. दोनवेळचे चहा, नाष्टा, जेवण आणि रहाण्याची मोफत सोय आहे. दररोज प्राणायम, समूपदेशन करण्यात येणार आहे. १५ स्वयंसेवक या सेंटरवर काम करणार आहेत.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक विलास चौथाई, जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती पांडूरंग कोरे, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे डॉ. राम लाडे, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ आदी उपस्थित होते. आभार जिल्हा कार्यवाह नारायण जोशी यांनी मानले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ