शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजनेचा खर्च सातशे कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:40 IST

अतुल जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव या तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी योजनेच्या कामावर १७-१८ या वर्षात फक्त २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनी केलेल्या शेकडो कोटींच्या घोषणा खोट्या ठरताना दिसत आहेत. या योजनेवर शासनाने आजअखेर ६८८ कोटींचा खर्च केला आहे. तरीही ...

अतुल जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव या तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी योजनेच्या कामावर १७-१८ या वर्षात फक्त २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनी केलेल्या शेकडो कोटींच्या घोषणा खोट्या ठरताना दिसत आहेत. या योजनेवर शासनाने आजअखेर ६८८ कोटींचा खर्च केला आहे. तरीही अजून योजना पूर्ण होण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी गरजेचा आहे.ताकारी योजनेच्या कामावर शासनाने आजअखेर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला; पण योजना अजूनही अपूर्ण आहे. गेल्या ३५ वर्षांपासून योजनेची कामे चालू आहेत; मात्र तेव्हापासून योजनेचा विस्तारही वाढत गेला आहे. प्रत्येक नेत्याने आपल्या मतदार संघातील हक्काची गावे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील घालण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या योजनेत चार तालुक्यातील ५१ गावांतील शेतीचा समावेश आहे. तासगाव व खानापूर तालुक्यातील अनेक गावांत कालवा खुदाईचे काम गतीने चालू आहे, तर कडेगाव तालुक्यातील तडसर, हिंगणगाव खुर्द येथील कालवा, पोटकालव्याची कामे चालू आहेत. पलूस-खानापूर तालुक्यातील गावांचा समावेश असलेली नवीन वितरिकावरील कामेही चालू आहेत.या योजनेच्या माध्यमातून १०८ किलोमीटरपर्यंतच्या गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. या परिसरातही कालवा दुरुस्ती, पोटपाट खुदाई, दारे बसविणे यासह विविध कामे अपूर्ण आहेत. यावरही शासनाने खर्च करणे गरजेचे आहे. अपूर्ण कामे जलदगतीने पूर्ण न केल्यामुळे योजनेचे बजेट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.अनेक नेत्यांनी योजनेस यावर्षी शेकडो कोटी निधी देण्याची घोषणा केली; होती पण या योजनेस यावर्षी फक्त २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.२०० कोटींची गरजताकारी योजनेचा कालवा, पोटकालवा खुदाई, दारे बसविणे यासह विविध कामे पूर्ण होण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी देण्यासाठी अजून २०० कोटींची गरज असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.