शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-जिल्ह्यात चार ठिकाणी चेक पोस्ट तात्काळ सुरू करा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:40 IST

सांगली : परदेश वारी करून तसेच होम क्वॉरंटाईनचा स्टँम्प लावलेल्या व्यक्ती पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून जिल्ह्यात येत असल्यास, अशा प्रवाशांची ...

ठळक मुद्देजिल्ह्यात चार ठिकाणी चेक पोस्ट तात्काळ सुरू करा : जिल्हाधिकारीकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने बैठक

सांगली : परदेश वारी करून तसेच होम क्वॉरंटाईनचा स्टँम्प लावलेल्या व्यक्ती पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून जिल्ह्यात येत असल्यास, अशा प्रवाशांची तपासणी करण्यासाठी सांगली जिल्ह्यात पेठ, अंकली, कडेगाव व नागज येथे तात्काळ चेक पोस्ट सुरू करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने वाहतूक आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, रेल्वे विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.परदेश वारी करून पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून जिल्ह्यात येत असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी पेठ, अंकली, कडेगाव व नागज या ठिकाणी चेक पोस्ट तात्काळ सुरू करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या प्रत्येक चेक पोस्टवर संबंधित ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक शिफ्टमध्ये आरोग्य विभागाचे दोन, पोलीस विभागाचे दोन व आरटीओ विभागाचा एक कर्मचारी या प्रमाणे तीन शिफ्टमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.

याबाबत संनिंयंत्रणासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कारवाई करावी. प्रत्येक चेक पोस्टवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या ठिकाणी परदेश वारी करून कोणी प्रवासी येत आहे किंवा कसे याची तपासणी करावी. यामध्ये परदेश वारी करून येणारा प्रवासी असल्यास त्याला स्टँम्पींग करावे. तसेच होम क्वारंटाईनचा स्टँम्प लावलेली व्यक्ती पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून प्रवास करत असल्यास त्यांची तपासणी करावी.

ज्या व्यक्तींना काही त्रास तसेच काही लक्षणे दिसत असल्यास त्याप्रमाणे ज्यांना आयसोलेशन कक्षात ठेवणे आवश्यक आहे त्यांना आयसोलेशन कक्षामध्ये पाठवावे व ज्यांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवणे आवश्यक आहे ते होम क्वॉरंटाईनच्या ठिकाणी पोहचतील याची खातरजमा करावी. चेक पोस्टवर नियुक्त करण्यात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आजच प्रशिक्षण आयोजित करून त्यांना चेक पोस्टवर करण्यात येणाऱ्या तपासणीबाबत व पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.याप्रमाणेच रेल्वे विभागानेही मिरज व सांगली रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी परदेश वारी करून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी आवश्यक पथक नेमावे. नियुक्त करण्यात आलेली पथके 24 तास कार्यरत ठेवावीत व आजपासूनच ही कार्यवाही सुरू करावी. यासाठी आवश्यक काही स्टाफ महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली